दोन शाळकरी मुलांचा तलावात बुडून मृत्यू - KhabarBat™ | Breaking News in Marathi

Breaking

KhabarBat™ | Breaking News in Marathi

२००९ पासून वाचकांच्या सेवेत | Latest Marathi News | Breaking News in Marathi |

सोमवार, जुलै ०४, २०२२

दोन शाळकरी मुलांचा तलावात बुडून मृत्यू जुन्नर /आनंद कांबळे 

जुन्नर शहरालगतच्या सोमतवाडी येथील पद्मावती तलावाच्या ठिकाणी फोटो काढण्यासाठी गेलेल्या दोन शाळकरी मुलांचा पाय घसरून ते दोघेही तलावात पडल्याने तेथील गाळमध्ये अडकून या दोघांचा मृत्यू झाल्याची घटना रविवारी दुपारी घडली. 


पवन दुर्गेश ठाकूर वय 13 , सम्राट देवेंद्र परदेशी वय 14 दोघेही राहणार परदेशपुरा जुन्नर असे हा घटनेत मयत झालेल्या शाळकरी मुलांची नावे आहेत. रविवारी दुपारी हे दोघे जण सोमतवाडी येथील पद्मावती तलाव येथे फिरण्यासाठी गेले होते. यावेळी फोटो काढीत असताना त्यांचा पाय घसरून ते दोघेही तलावात पडले. तेथे असलेल्या खोल खड्ड्यांमधील गाळा मध्ये अडकून या दोघांचा मृत्यू झाला. स्थानिक लोकांनी त्यांना ओढून बाहेर काढले. त्यांना जुन्नर ग्रामीण रुग्णालयात नेण्यात आले असता तेथील डॉक्टरांनी ते मयत असल्याचे सांगितले. अभिलाष परदेशी यांनी या घटनेची खबर जुन्नर पोलिसांना दिली. पुढील तपास जुन्नर पोलिस करीत आहेत.


जुन्नर, महाराष्ट्र 410502, भारत

Latest News on Junnar | Breaking Stories and Opinion Articles


related query