LaluPrasadYadav यांची प्रकृती चिंताजनक; मोदींनी केली विचारपुस - KhabarBat™ | Breaking News in Marathi

Breaking

KhabarBat™ | Breaking News in Marathi

२००९ पासून वाचकांच्या सेवेत | Latest Marathi News | Breaking News in Marathi |

मंगळवार, जुलै ०५, २०२२

LaluPrasadYadav यांची प्रकृती चिंताजनक; मोदींनी केली विचारपुस

राजदचे प्रमुख लालू प्रसाद यादव यांची प्रकृती चिंताजनक
पटना राजदचे प्रमुख लालू प्रसाद यादव यांची प्रकृती चिंताजनक आहे. पटना शहरातील एका हॉस्पिटलमध्ये त्यांच्यावर उपचार सुरु आहेत. खांद्याला फ्रॅक्चर झाल्याने त्यांना हॉस्पिटलमध्ये भरती केलं होतं. परंतु आता त्यांच्या शरीराच्या काही भागांची हालचाल बंद होण्याचा धोका आहे.

यामुळे डॉक्टरांना त्यांच्यावर उपचार करण्यात आडचण येतं आहे. लालू यादव अनेक दिवसांपासून किडनीच्या आजाराने त्रस्त आहेत. किडनीच्या आजारावर उपचार करण्यासाठी त्यांना एम्समध्ये भरती केलं होतं. हॉस्पिटलमधील डॉक्टरांची एक टीम त्यांच्या प्रकृतीची काळजी घेत आहे.

प्रत्येक आजारासाठी वेगवेगळ्या डॉक्टरांची नियुक्ती केली आहे. वेदना कमी करणारे औषध दिल्यास किडनी फेल होण्याचा धोका आहे. खांद्याच्या फ्रॅक्चरवर उपचार केल्यानंतर त्यांच्या किडनीवर उपचार केले जाणार आहेत.

#LaluPrasadYadav