भारतीय हवामान विभागाकडून चंद्रपूर जिल्ह्यासाठी महत्त्वाची अपडेट - KhabarBat™ | Breaking News in Marathi

Breaking

KhabarBat™ | Breaking News in Marathi

२००९ पासून वाचकांच्या सेवेत | Latest Marathi News | Breaking News in Marathi |

शुक्रवार, जुलै १५, २०२२

भारतीय हवामान विभागाकडून चंद्रपूर जिल्ह्यासाठी महत्त्वाची अपडेट

शनिवारपासून पुन्हा बरसणार पाऊस




भारतीय हवामान विभाग , प्रादेशिक हवामान केंद्र , नागपूरच्या जिल्हास्तरीय मूल्य वर्धित अंदाजानुसार चंद्रपूर  Chandrapur  जिल्हयामध्ये पुढील पाच दिवसात १६ ते २० जुलै २०२२ रोजी आकाश ढगाळ राहून कमाल तापमान २५.९ ते २६.५ अंश सेल्सिअस तर किमान तापमान २१.८ ते २२.३ अंश सेल्सिअस राहून सर्वत्र ठिकाणी हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडण्याची अधिक शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे .

इरई,निम्न वर्धा,गोसेखुर्द धरणातून पाण्याचा विसर्ग सूरूच आहे.त्यामुळं नदीचे पात्र फुगले आहेत.यामुळं चंद्रपूर शहर तथा ग्रामीण भागातील नागरिकांची धाकधूक वाढली आहे.वर्धा तथा वैनगंगेला पुन्हा पुर येण्याचा धोका वाढला आहे.

चंद्रपूर जिल्ह्यात दिनांक १६ ते १८ जुलै तुरळक / एक किंवा दोन ठिकाणी विजांचाकडकडाट , मेघगर्जनेसह मध्यम ते जोरदार स्वरूपाचा पाऊस पडण्याची अधिक शक्यता आहे तसेच दिनांक १ ९ व २० जुलै रोजी तुरळक / एक किंवा दोन ठिकाणी मध्यम ते जोरदार स्वरूपाचा पाऊस पडण्याची अधिक शक्यता आहे. 

इरई,निम्न वर्धा,गोसेखुर्द धरणातून पाण्याचा विसर्ग सूरूच आहे.त्यामुळं नदीचे पात्र फुगले आहेत.यामुळं चंद्रपूर शहर तथा ग्रामीण भागातील नागरिकांची धाकधूक वाढली आहे.वर्धा तथा वैनगंगेला पुन्हा पुर येण्याचा धोका वाढला आहे.

Important update for Chandrapur district from Indian Meteorological Department