Top News

49 पोलीस पाटील पदासाठी ऑनलाईन भरती; अर्ज 6 जूनपर्यंत मागविले | police patil bharti 2023

  उमरेड उपविभागात 49 पोलीस पाटील पदासाठी ऑनलाईन भरती नागपूर,दि. 31 :   police patil bharti 2023  जिल्ह्यातील उमेरड उपविभागातील उमरेड...

ads

सोमवार, जुलै ११, २०२२

गणेश मूर्तींची उंची किती असावी? भारतीय जनता युवा मोर्चाने दिले मनपाला निवेदन! |

 गणेश मूर्तींची उंची किती असावी? 

भारतीय जनता युवा मोर्चाने दिले मनपाला निवेदन!



गणपती हे महाराष्ट्राचे नव्हे तर संपुर्ण देशाचे आराध्य दैवत आहे. यंदा २०२२ चा गणेश उत्सव हा ३१/०८/२०२२ ते ०९/०९/२०२२ दरम्यान रहाणार आहे. अश्या वेळी मागील दोन वर्षांपासुन कोविडमुळे आपण साजरा करू शकलो नसल्यामुळे सर्वांच्या मनात उत्साह आणि आनंद असतांना प्रशासनाने गणपतीची मुर्ती ही केवळ ४ फुटाची असावी असा नुकताच आदेश काढला आहे. यामुळे दोन समुहांमध्ये परिणाम पडला आहे. एक म्हणजे मुर्तीकार ज्यांनी तीन ते सहा महिन्यांपुर्वीच आपल्या कामाची सुरूवात केली होती. ज्यांच्यासाठी हा निर्णय हा आर्थिक प्रमाणावर नुकसान करणारा आहे आणि दुसरा परिणाम  हा सामान्य माणसाच्या उत्साहावर होईल. 



गणपती उत्सवाच्या निमित्याने लोक मोठ्या प्रमाणावर एकत्रित होतात व हा उत्सव साजरा करतात. या निर्णयामुळे त्यांच्या देखील उत्सहावर आघात पडणार आहे. त्यामुळे आपण सामान्य जनतेची भावना व मुर्तीकारांचे आर्थिक नुकसान होणार नाही याची प्रमुख खबरदारी घेण्याकरीता भारतीय जनता युवा मोर्चाच्या माध्यमातुन मनपा अतिरिक्त आयुक्त राम जोशी यांना  निवेदन देण्यात आले. 


चार फूटापेक्षा अधिक उंच गणेश मूर्तीवर लादलेले निर्बंध तत्काळ मागे घेण्याबाबत महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त राम जोशी यांच्यासोबत यावेळी चर्चा झाली. उद्या सायंकाळपर्यंत निर्णय मागे न घेतल्यास भाजप वेगळी भूमिका घेईल, असेही यावेळी अतिरिक्त आयुक्तांना सांगण्यात आले. यावेळी प्रमुख्याने भाजपा प्रदेश महामंत्री व माजी पालकमंत्री आ. चंद्रशेखर बावनकुळे, भाजपा शहराध्यक्ष आ. प्रवीण दटके, माजी महापौर संदीप जोशी, शिवानी दाणी वखरे, प्रदेश महामंत्री, भाजयुमो महाराष्ट्र, पारेंद्र पटले, शहर अध्यक्ष, भाजयुमो नागपुर महानगर, महामंत्री सचिन करारे, दिपांशु लिंगायत, अमोल तिडके, निलेश राऊत, शौनक जहांगीरदार, प्रसाद मुजुमदार, मनमित पिल्लारे, चेतन धार्मिक, समीर मंडले, अथर्व त्रिवेदी, शुभम वेलंकीवार, एजाज शेख, वरूण गजभिये , आशुतोष भगत, शिव कटरे, अंकित वानखेडे, आशिष तुरकर यांच्या समवेत मुर्तीकार राकेश पाठराबे, रघु मैसाने, सचिन दुरुगकर, सचिन चव्हाण, निलेश इंगळे, सूर्या डोमडे व गणेश उत्सव मंडळांचे पदाधिकारी देखील उपस्थित होते. 


Ganesh Chaturthi ganesh utsav 2022

Ganesh Chaturthi for the year 2022 is celebrated/ observed on Tuesday, August 30. Ganesh Chaturthi or Vinayaka Chaturthi is the Hindu celebration of the ...

SHARE THIS

Author:

खबरबात™ (Khabarbat™) हे मराठी माध्यमातील लोकप्रिय वेबपोर्टल आहे. ताज्या बातम्यांसह डिजिटल अपडेट, राजकीय, सामाजिक, पर्यावरण, रोजगार, बिझनेस बातम्या दिल्या जातात. भारत सरकारच्या माहिती व प्रसारण खात्याच्या डिजिटल मीडिया विभागाकडे Intermediary Guidelines and Digital Media Ethics Code) Rules 2021 नुसार नोंदणीकृत आहे.