चंद्रपूर शहरात 1000 जणांना सुरक्षीत स्थळी हलविले - KhabarBat™ | Breaking News in Marathi

Breaking

KhabarBat™ | Breaking News in Marathi

२००९ पासून वाचकांच्या सेवेत | Latest Marathi News | Breaking News in Marathi |

गुरुवार, जुलै १४, २०२२

चंद्रपूर शहरात 1000 जणांना सुरक्षीत स्थळी हलविले
चंद्रपूर महानगरपालिका आपत्ती व्यवस्थापन टीमद्वारे पुरग्रस्त भागातील 1000 नागरीकांना सुरक्षीत स्थळी आणण्यात आले आहे. 

 ईरई धरणाचे सातही दरवाजे १.० मीटरने उघडण्यात आल्यानंतर पाण्याच्या पातळीत वाढ होऊन रहमत नगर परीसरातील नागरीकांच्या घरात पाण्याचा शिरकाव सुरु झाला. परिस्थितीवर लक्ष ठेऊन असणाऱ्या महानगरपालिकेच्या आपत्ती व्यवस्थापन टीमने बचाव कार्य सुरु करून नागरीकांना सुरक्षित स्थळी आणले गेले आहे. 

रहमत नगर, सिस्टर कॉलोनी,राष्ट्रवादी नगर, तुलसी नगर, ठक्कर कॉलोनी येथे रेस्क्यु ऑपरेशन राबवुन नागरीकांना सुरक्षीत बाहेर काढण्यात आले आहे. मनपाच्या महाकाली कन्या शाळा येथे ११४, माना प्राथमिक शाळा येथे ८०, शहिद भगतसिंग शाळा येथे ३५, महात्मा फुले शाळा येथे २१६, किदवई शाळा येथे ८५  जेष्ठ नागरिक संघ येथे ४६,अग्रसेन भवन येथे १५, पूर्व माध्यमिक शाळा येथे ९३ तर नागाचार्य मंदीर येथे १२९ नागरीकांना ठेवण्यात आले असुन त्यांची व्यवस्था व देखभाल करण्यात येत आहे. महानगरपालिकेद्वारा आपत्ती व्यवस्थापन टीम सतत कार्यरत असुन अनेक रहिवासी भागात पाणी शिरल्याने नागरीकांना बाहेर काढण्याची मोहीम रात्रीपासून सुरु आहे.
#चंद्रपूर #chandrapur #आपत्तीव्यवस्थापन #flood #DisasterManagement #ChandrapurCityMunicipalCorporation #safetyfirst
#DisasterResponse #emergencyresponse #Monsoon #Thunderstorms #weather #Thundering #lightning