शशांक कुलकर्णी यांना प्रतिष्ठित गांधी सेवारत्न पुरस्कार घोषित Distinguished Gandhi Sevaratna Award announced to Shashank Kulkarni - KhabarBat™

Breaking

KhabarBat™

२००९ पासून वाचकांच्या सेवेत

०७ जुलै २०२२

शशांक कुलकर्णी यांना प्रतिष्ठित गांधी सेवारत्न पुरस्कार घोषित Distinguished Gandhi Sevaratna Award announced to Shashank Kulkarniशशांक कुलकर्णी यांना प्रतिष्ठित गांधी सेवारत्न पुरस्कार घोषितविदर्भातील शेतकऱ्यांच्या आत्महत्यांना रोखण्यासाठी महत्वपूर्ण संशोधन करणारे आंतरराष्ट्रीय खाती प्राप्त कृषी धोरण शास्त्रज्ञ शशांक कुलकर्णी यांना यावर्षीचा गांधी सेवारत्न पुरस्कार जाहीर झाला आहे. वेक पीपल कौन्सिलतर्फे दरवर्षी दिला जाणारा हा सन्मान सेवा क्षेत्रात महत्त्वाचा मानला जातो. ही परिषद संयुक्त राष्ट्रांशी संलग्न राहून कार्य करते.  हा पुरस्कार त्यांना २४ जुलै रोजी भोपाळ येथे प्रदान करण्यात येणार आहे. या कार्यक्रमात जगभरातील मान्यवर प्रमुख पाहुणे म्हणून सहभागी होणार आहेत.

शशांक कुलकर्णी यांना पत्राद्वारे पुरस्कार जाहीर झाल्याची माहिती परिषदेचे अध्यक्ष डॉ.विजय बजाज यांनी दिली. ते म्हणाले की, कुलकर्णी हे गेल्या काही वर्षांपासून जम्मू-काश्मीरमधील संवेदनशील भागात महत्त्वाचे सामाजिक कार्य करत आहेत. समाजासोबत राहून समाजाचे प्रश्न सोडवणारे ते संशोधक आहेत.

शशांक कुलकर्णी हे प्रख्यात कवी, लेखक, वक्ता आणि आंतरराष्ट्रीय ख्यातीचे कृषी धोरण शास्त्रज्ञ आहेत. त्यांचा जन्म १९९० साली महाराष्ट्रातील साखराळे (जिल्हा सांगली) गावात झाला. त्यांनी जम्मू केंद्रीय विद्यापीठाच्या लोकनिती व लोकप्रशासन विभागात   विद्यापीठ अनुदान आयोगाचे सीनिअर रिसर्च फेलो या नात्याने विशेष कार्य केले आहे. त्यांच्या संशोधन आणि लेखन कार्यासाठी जगातील विविध देशांनी त्यांचा गौरव केला आहे. विविध विषयांवर त्यांनी मराठी, हिंदी, इंग्रजी भाषांमध्ये दहाहून अधिक पुस्तके लिहिली आहेत. त्यांनी विविध राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय संशोधन जर्नल्समध्ये लेखन केले आहे. पूज्य द्वारकानाथ शास्त्री राष्ट्रीय संशोधन केंद्राच्या उभारणीत त्यांनी महत्त्वाची भूमिका बजावली आहे. त्यांना 'बाबा लक्ष्मण दास राष्ट्रीय स्मारक निर्माण सेवा समिती'चे प्रवर्तक म्हणूनही ओळखले जाते, ही जम्मू आणि काश्मीरची एक अभिनव सामाजिक आणि आध्यात्मिक चळवळ आहे. भारताच्या शेतकरी धोरणाच्या संदर्भात त्यांनी केलेल्या मूलभूत संशोधन कार्याची दखल घेऊन दक्षिण अमेरिकेतील प्रसिद्ध स्वाहिली विद्यापीठाने त्यांना सन्मानित केले आहे.


This year's Gandhi Sewaratna award has been announced to Shashank Kulkarni, an internationally acclaimed agricultural policy scientist who has done significant research to prevent farmer suicides in Vidarbha.