महाराष्ट्र पदवीधर संघटना जिल्हाध्यक्षपदी दिपक खोब्रागडे यांची निवड | Deepak Khobragade - KhabarBat™ | Breaking News in Marathi

Breaking

KhabarBat™ | Breaking News in Marathi

२००९ पासून वाचकांच्या सेवेत | Latest Marathi News | Breaking News in Marathi |

सोमवार, जुलै ११, २०२२

महाराष्ट्र पदवीधर संघटना जिल्हाध्यक्षपदी दिपक खोब्रागडे यांची निवड | Deepak Khobragade

 

नागभीड प्रतिनिधी/ दिनांक 11 जुलै 2022

महाराष्ट्र पदवीधर संघटना एमपिएस या संघटनेच्या माध्यमातून पदवीधर युवक-युवती साठी कार्य करुन त्यांना योग्य ते न्याय देण्याच्या उद्देशाने व महाराष्ट्र पदवीधर संघटनेची संघटनात्मक बांधणी करून विचारधारा जनसामान्यांपर्यंत पोहोचविण्यासाठी नागभीड तालुक्यातील नांदेड येथील दिपक मिञजीत खोब्रागडे यांची जिल्हाध्यक्षपदी निवड करुन नियुक्तीपत्र देण्यात आले आहे.

सदर संघटनेचे प्रदेशाध्यक्ष तथा पश्चिम महाराष्ट्र राज्य अध्यक्ष श्री. दिपक बंडगर यांनी दिपक खोब्रागडे यांची नियुक्ती करुन पुढील कार्यास शुभेच्छा देऊन अभिनंदन केले आहे.