शेतमजुरांना नेणारा पिकअप उलटला ; ४३ शेतमजुर जखमी ChandrapurNews - KhabarBat™

Breaking

KhabarBat™

२००९ पासून वाचकांच्या सेवेत

१२ जुलै २०२२

शेतमजुरांना नेणारा पिकअप उलटला ; ४३ शेतमजुर जखमी ChandrapurNews




Chandrapur/News
शेतमजूराना घेऊन निघालेले पिकअप वाहन उलटले. यात 43 मजूर जखमी झाले आहेत. ही घटना चिमूर तालुक्यातील गोदेंडा-खांबाळा मार्गावर आज घडली.

या घटनेत सूदैवाने जिवीतहाणी झालेली नाही.जखमींना उपचारासाठी रूग्णालयात हलविण्यात आले आहे.जिल्ह्यात जोरदार पाऊस सूरू आहा.त्यामुळे शेतीच्या कामाला गती आली आहे.मजूरांची कमतरता असल्याने पिकअप,ऑटोने मजूरांना शेतात नेल्या जात आहे. चिमूर तालुक्यातील येरखडा येथील पिकअप वाहनाने केवाडा गावातील शेतमजुर गोंदेडा -खांबाडा मार्गावरील मनोज नत्थुजी वाघे यांचा शेताकडे घेऊन जात असातांना पिकअप वाहन चालकाचे नियंत्रण सुटल्याने रस्त्याच्या वाहन उलटले. या वाहनात 43 मजूर होते.अपघात होताच आसपासचे शेतकरी, शेतमजुर धावून गेलेत.वाहनात दबलेल्या जखमींना बाहेर त्यांनी बाहेर काढले. जखमींना उपचाराकरीता प्राथमिक आरोग्य केंद्र नेरी येथे हलविण्यात आले. या अपघातात 19 शेतमजुर गंभीर जखमी झालेत तर 24 शेतमजूर किरकोड जखमी झाले आहेत.