ग्रामपंचायत कर्मचाऱ्याचा आढळला मृतदेह - KhabarBat™

Breaking

KhabarBat™

२००९ पासून वाचकांच्या सेवेत

२१ जुलै २०२२

ग्रामपंचायत कर्मचाऱ्याचा आढळला मृतदेह

चंद्रपुर  । नकोडा येथील ग्रामपंचायत कर्मचाऱ्याचा मृतदेह आज गुरुवारी सायंकाळी नकोडा येथे चारचाकी वाहनात आढळल्याची घटना उघडकीस आली आहे. दिलीप लोणारे असे मृत सफाई कर्मचाऱ्याचे नाव आहे. 
दरम्यान घुग्गुस पोलिसांना याची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन मृतदेह शव विच्छेदनासाठी जिल्हा सामान्य रुग्णालयात पाठवला आहे. मृतक दिलीप लोणारे हा मागील 3 दिवसांपासून बेपत्ता होता. दरम्यान याची तक्रार घुग्गुस पोलिसात देण्यात आली होती.अशातच त्याचा मृतदेह चारचाकी वाहनात आढळुन आला. मृतक दिलीप हा मद्यप्राशन करून असल्याचे आढळल्याचे पोलीस तपासात निष्पन्न झाले आहे.या घटनेचा पुढील तपास आता घुग्गुस पोलिसांनी सुरू केला आहे.

#Chandrapur #police #Ghughus #Nakoda