.... आणि गहिनीनाथाचे वाचले प्राण; बैलजोडी निघाली पुरातून बाहेर | - KhabarBat™

Breaking

KhabarBat™

२००९ पासून वाचकांच्या सेवेत

१७ जुलै २०२२

.... आणि गहिनीनाथाचे वाचले प्राण; बैलजोडी निघाली पुरातून बाहेर |

चंद्रपूर (DEONATH GADATE/CHANDRAPUR )। कोरपना तालुक्यातल्या नांदा येथील नाल्याला महापूर आहे. गेले 10 दिवस हा नाला पुराच्या पाण्याने भरून वाहतोय. पुलाच्या पलीकडे असलेल्या सात ते आठ गावांना हा नाला पार करून शेतशिवारात जावे लागते. शेतावर जाण्यासाठी पूर आलेल्या नाल्यातून बैलगाडीने मार्ग काढीत असताना पूराच्या प्रवाहाने बैलजोडीसह शेतकरी वाहून जात असताना नाल्यालगत असलेल्या शेतक-यांनी समयसुचकतेने सदर शेतक-यांसह बैलजोडीला वाचविण्यात यश आले आहे.


#CHANDRAPUR #NEWS #FLOOD #RAIN
                                        #CHANDRAPUR #NEWS #FLOOD #RAIN

गेली 15 वर्षे या नाल्यावर पूल बांधण्याची ग्रामस्थांची मागणी सरकार दरबारी रखडली आहे. हाच रस्ता पुढे कोरपना- आदिलाबाद राष्ट्रीय महामार्गाला जोडला जातो. मात्र यामार्गे असलेला बारमाही नाला विकासात अडसर ठरलाय. शेतीच्या अत्यावश्यक कामांसाठी बैलगाडीत असलेल्‍या दोघांसह पुरातून वाट काढत असताना प्रचंड प्रवाहामुळे बैलगाडी वाहून गेली. नदीच्या काठावर असलेल्या ग्रामस्थांनी धावाधाव करत मदत केल्याने बैलजोडी व गाडीतील गहिनीनाथ वराटे यांचे प्राण वाचले.  हा पूराचा थरार कॅमे-यात कैद झाला आहे.   



(Gahininath Varate)  #CHANDRAPUR #NEWS #FLOOD #RAIN #flood #flooding #waterdamage #water #rain #nature #restoration #insurance #mold #fire #flooddamage #storm #firedamage #disaster #photography #climatechange #waterdamagerestoration #propertydamage #covid #moldremediation #remediation #watermitigation #floods #weather #river #hurricane #kerala #life #india #moldremoval