पुरातील पडक्या झोपडीत भयाण रात्र - KhabarBat™ | Breaking News in Marathi

Breaking

KhabarBat™ | Breaking News in Marathi

२००९ पासून वाचकांच्या सेवेत | Latest Marathi News | Breaking News in Marathi |

शुक्रवार, जुलै १५, २०२२

पुरातील पडक्या झोपडीत भयाण रात्र

सहा मजूरांनी काढली पुरातील पडक्या झोपडीत भयाण रात्र
चंद्रपूर (Chandrapur) जिल्ह्यात मागील आठवडाभरापासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे वर्धा नदीचा जलस्तर वाढला. त्यामुळे मजुरांनी जिव वाचविण्यासाठी जवळच्या विसापूर गावाकडे धाव घेतली. परंतु पुरामुळे विसापूरकडे येण्याचा मार्ग बंद होता. अखेर त्या मजूरांना बुधवारची रात्र जीव मुठीत घेऊन शेतशिवारातील एका पडक्या झोपडीत काढावी लागली.

मागील वर्षभरापासून बल्लारपूर (Ballarpur) तालुक्यातील विसापूर-कोलगाव वर्धा नदीवर पुलाचे बांधकाम निर्माणाधीन आहे. त्या ठिकाणी 6 मजूर सामानाची देखभाल करण्यासाठी थांबले होते. बुधवारी अचानक वर्धा नदीचा जलस्तर वाढला. त्यामुळे त्या मजुरांनी जिव वाचविण्यासाठी जवळस असलेल्या विसापूर गावाकडे धाव घेतली. परंतु पुरामुळे विसापूरकडे येण्याचा मार्ग देखील बंद होता. सभोवती पाणी वाढत होते. पुर वाढत असल्याने आणि सभोवती पाणी असल्याने त्यांना बाहेर निघता येणे शक्य नव्हते. जवळपासून कुणी आढळूनही आले नाही. त्यामुळे आपण पुरात अडकल्याची माहिती जवळच्या गावकऱ्यांना व्हावी, याकरीता त्यांची धडपड सुरू होती. दरम्यान त्यापैकी एकाकडे मोबाईल असल्याने त्याने आम्ही सहा मजूर पुरात अडकून अडकून असल्याची माहिती रात्री ८ वाजता विसापूर येथे दिली. लगेच बल्लारपूरचे पोलीस निरीक्षक उमेश पाटील यांना माहिती देण्यात आली. त्यांनी तातडीने घटनास्थळी येऊन परिस्थिती जाणून घेतली. पुरात अडकलेल्या सहाही मजुरांना ग्रामपंचायतच्या जुन्या पडक्या घरात आसरा घेण्याची मोबाईल वरून सूचना केली. सदर घटनेची माहिती जिल्हाधिकारी अजय गुल्हाने, बल्लारपूरच्या उपविभागीय अधिकारी दिप्ती सूर्यवंशी (पाटील ), तहसीलदार संजय राईचंवार यांना विसापूरचे उपसरपंच अनेकश्वर मेश्राम यांनी दिली. मात्र बुधवारी रात्र झाल्यामुळे रेस्क्यू ऑपरेशन करण्यासाठी अडचण निर्माण झाली. त्या सहाही जणांनी बेट स्वरूपात असलेल्या ठिकाणी काळोखात रात्र काढावी लागली. गुरूवारचा दिवस उजाडला. सकाळी ६ वाजता जिल्हा आपत्ती व्यवस्थापन पथकाने त्या मजूरांचे रेस्यूवर करण्यासाठी घटनास्थळाकडे कूच केली. आणि त्या मजूरांना वाचविण्यासाठी रेक्यूली सुरू झाले. शेतशिवारातील त्या झोपडीकडे बोटीने कुच केली. दूरपर्यंत काहीच समजत नव्हते. अखेर जवळपास गेल्यानंतर त्यांचे लोकेशन कळले. जिवाच्या आकांताने सहाही मजूर घाबरलेले होते. त्या मजूरांसाठी ही रात्र काळरात्र ठरते की काय? अशी अवस्था त्या मजूरांची झाली होती. आपत्तीव्वस्थापनाचे चमू दिसताच त्यांच्या जिवात जीव आले. त्यांच्या चेहऱ्यावर आनंदाश्रू दिसून आले. विनोद पिंपळशेंडे, प्रल्हाद बारस्कार, बाबुराव मेश्राम, प्रकाश केवट, सुजान केवट व सुखीलाल केवट असे या मजुरांची नावे आहेत.

पोलीस निरीक्षक उमेश पाटील यांच्या मार्गदर्शनात, विसापूरचे माजी सरपंच बंडू गिरडकर यांच्या मदतीने सहाही मजूरांना पुरातून बाहेर काढण्यात आले. जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्रमुख विजय बुंगले नेतृत्वा त्याच्या पथकाने महत्वपूर्ण कामगिरी केल्याने त्यांचे कौतूक होत आहे.

Heavy rain rainfall India Maharashtra
Chandrapur flood rain ballarpur
Wardha River