इनरव्हिल क्लब ऑफ वरोरा तर्फे "डॉक्टर्स डे व C.A.डे" साजरा - KhabarBat™

Breaking

KhabarBat™

२००९ पासून वाचकांच्या सेवेत

०२ जुलै २०२२

इनरव्हिल क्लब ऑफ वरोरा तर्फे "डॉक्टर्स डे व C.A.डे" साजरा

शिरीष उगे (वरोरा प्रतिनिधी) :
कोरोना च्या कठीण काळात देवदूत ठरलेल्या सर्व डॉक्टरांना आपण खुप जवळून बघीतले आहे त्यांच्या निस्वार्थ कार्याची दखल घेत आमच्या इनरव्हिल क्लब ने दरवर्षी प्रमाणे यावर्षी ही हा दिवस डॉक्टरांचा सन्मान करून साजरा केला.
आम्ही शहरातील महिला डॉक्टर डाॅ. साक्षी उपलेंचवार, डॉ. हेमा खापने, डॉ. मीरा वझे, डॉ. पुर्णिमा धांडे यांचा त्यांच्या क्लिनिक मधे जाऊन सत्कार केला.तसेच वरोरा येथील सुप्रसिद्ध C.A. श्री. दिनेशजी मुथा यांचा शाल व श्रीफळ देऊन सत्कार केला.
यावेळी आमच्या इनरव्हिल क्लब च्या अध्यक्षा निलिमा गुंडावार, सचिव साक्षी उपलेंचवार, अर्वा अली हुसेन, कविता बाहेती, अपेक्षा पांपट्टीवार, स्नेहल पत्तीवार, आरती भोयर, वैशाली पद्ममावार व अन्य सदस्या उपस्थित होत्या.