सावरटोला परिसरात अतिवृष्टीचा भात पिकाबरोबरच भाजीपाला उत्पादक शेतकऱ्यांनाही फटका. - KhabarBat™ | Breaking News in Marathi

Breaking

KhabarBat™ | Breaking News in Marathi

२००९ पासून वाचकांच्या सेवेत | Latest Marathi News | Breaking News in Marathi |

गुरुवार, जुलै २१, २०२२

सावरटोला परिसरात अतिवृष्टीचा भात पिकाबरोबरच भाजीपाला उत्पादक शेतकऱ्यांनाही फटका.

राष्ट्रवादी चे मुख्यमंत्र्यांना निवेदन.
संजीव बडोल प्रतिनिधी.
नवेगावबांध दि.२१ जुलै:-
गेल्या आठवड्यापासून परिसरात झालेल्या अतिवृष्टीमुळे  भाताबरोबरच भाजीपाला लागवड करणाऱ्या शेतकऱ्यांची मोठी नुकसान झाली आहे. नुकसानग्रस्त धानपिक व भाजीपाला उत्पादक शेतकऱ्यांना पुरामुळे उद्भवलेल्या परिस्थितीची पाहणी करून पंचनामे,सर्वे करून करून पीडित शेतकऱ्यांना आर्थिक मदत करावी. अशी मागणी जिल्हा परिषदेचे माजी सदस्य किशोर तरुणे यांनी केली आहे.नवेगावबांध परिसरामध्ये सततच्या पावसामुळे नाल्यांना पूर आल्याने भातशेतीचे रोपवाटीकांची नुकसान झालेली आहे. परंतु त्याच बरोबर छोट्या छोठ्या प्रमाणात भाजीपाला लागवड करणाऱ्या शेतकऱ्यांच्या शेती या पुराच्या पाण्याखाली बुडलेली आहे. कुणाच्या पानामुळे धनाची परे सडलेल्या अवस्थेत आहेत त्यामुळे शेतकरी रोवणी कशी करणार. असा प्रश्न शेतकऱ्यांसमोर उपस्थित झाला आहे. धान पिकाची रोग निघालेल्या बांधावर पुराचे पाणी साठून आहे.  सावरटोलाबोरटोला परिसरात नाल्याच्या पुरामुळे शेकडो एकर शेती पाण्याखाली आली आहे. पूर पीडित शेतकऱ्यांनी महसूल विभागाच्या अधिकाऱ्यांना पुराच्या पाण्याखाली असलेल्या शेतीचे पंचनामे करून नुकसान भरपाई देण्याची मागणी वारंवार केली आहे परंतु संबंधित विभागाने अद्यापही लक्ष दिले नाही. वारंवार प्रसारमाध्यमाद्वारे तसेच महसूल विभागाच्या संबंधित अधिकाऱ्यांना निवेदन देऊनही अजून पर्यंत प्रशासन कुंभकर्णी झोपेत असल्याचे लक्षात येत आहे. नदी,नाल्याकाठी गावातील तलावाच्या बॅकवॉटर परिसरातील झालेल्या नुकसानीचे पंचनामे केल्याचे अजून पर्यंत निदर्शनास आले नाही. तरी माननीय जिल्हाधिकारी यांनी प्रत्यक्ष लक्ष देऊन शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन सूक्ष्मातिसूक्ष्म सर्वे करून प्रत्यक्ष नुकसान झालेल्या लाभार्थ्यांना नुकसान भरपाई चा लाभ घेण्याकरिता प्रस्ताव शासनाकडे सादर करावेत. अशी विनंती माजी जिल्हा परिषद सदस्य किशोर तरोणे यांनी केली आहे.
कोट
दरम्यान अर्जुनी मोरगाव तालुका राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने आज दिनांक 21 जुलैला तहसीलदार विनोद मेश्राम यांना मुख्यमंत्र्याच्या नावे निवेदन देण्यात आले.तहसीलदार,कृषी अधिकारी, कृषी सहाय्यक, स्थानिक तलाठी,सरपंच,पोलीस पाटील यांच्या मार्फत सूक्ष्म सर्वेक्षण करून पंचनामे करावेत. अशी मागणी करण्यात आली. यावेळी तालुका राष्ट्रवादीचे अध्यक्ष  लोकपाल गहाणे,किशोर तरोणे, दुर्योधन मैंद,डॉ. दीपकरहिले, योगेश हलमारे, राकेश लंजे,देवानंद नंदेश्वर निवेदन देताना उपस्थित होते.