भीषण अपघातात चौघे ठार; तर दोन गंभीर जखमी - KhabarBat™

Breaking

KhabarBat™

२००९ पासून वाचकांच्या सेवेत

२८ जुलै २०२२

भीषण अपघातात चौघे ठार; तर दोन गंभीर जखमी
संजीव बडोले प्रतिनिधी.                                        
नवेगावबांध दि.२८ जुलै :-

काल दि.२७ जुलै रोज बुधवार ला रात्री ११:०० वाजेच्या सुमारास नवेगावबांध येथुन सोलर पंप फिटिंग करून कामावरून आमगाव तालुक्यातील नवेगाव येथे आपल्या स्वगावी घरी परततांना नवेगावबांध कोहमारा मार्गावर खोबा व परसोडीच्या मध्ये जंगल परीसरात टाटा नेक्सान क्र. एमएच ५३,एजी  ८७७१ या चार चाकी वाहनाचा तोल बिघडून झालेल्या भीषण अपघातात दोन जणांचा जागीच मृत्यू झाला. तर दोन युवकांचा उपचारा दरम्यान मृत्यू झाला . असे या अपघातात चार युवक ठार झाले. सर्व मृतक १८ ते २४ वर्षे वयोगटातील आहेत.तर दोन युवक गंभीर जखमी झाले आहेत. मृतकामध्ये आमगाव तालुक्यातील नवेगाव येथील रामकृष्ण योगराज बिसेन वय २४ वर्ष, सचिन गोरेलाल कटरे वय २३ वर्ष,यांचा जागेवरच अपघाती मृत्यु झाला.संदिप जागेश्र्वर सोनवाने वय १८ वर्ष नवेगाव तालुका आमगाव, तर चालक  वरुन निलेश तुरकर वय २७ वर्ष ,राहणार भजेपार तालुका आमगाव यांचा उपचारादरम्यान ग्रामिण रुग्णालय नवेगावबांध येथे  अपघाती मृत्यू झाला आहे. चार चाकी वाहनाने जबरदस्त धडक दिल्याने गाडीचा चंदामेंदा झाला आहे.अपघाताची माहिती मिळताच ठाणेदार संजय पांढरे आपल्या सहकाऱ्यासह घटनास्थळावर दाखल होऊन,जखमींना उपचारासाठी नवेगावबांध ग्रामीण रुग्णालयात दाखल केले.मधुसुदन नंदलाल बिसेन वय २३ वर्ष ,प्रदीप कमलेश्वर बिसेन वय २४ वर्ष दोन्ही  राहणार नवेगाव तालुका आमगाव जि. गोंदीया यांना पुढील उपचाराकारिता केटीएस जिल्हा सामान्य रुग्णालय गोंदीया येथे  रेफर करण्यात आले. सदर जखमी गोंदिया येथील एका खाजगी रुग्णालयात उपचार घेत असल्याचे समजते.चारही मृतकाचे मृतदेह शवविच्छेदनाकरिता  पोलिसांनी नवेगावबांध येथील ग्रामीण रुग्णालय येथे शवविच्छेदन करून प्रेत नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आले आहे.घटनेच्या तपास डुग्गीपार व नवेगावबांध पोलीस करीत आहेत.