गरजू विद्यार्थ्यांसाठी नवेगावबांध पोलीस ठाण्यात मार्गदर्शन शिबिर. - KhabarBat™

Breaking

KhabarBat™

२००९ पासून वाचकांच्या सेवेत

२१ जुलै २०२२

गरजू विद्यार्थ्यांसाठी नवेगावबांध पोलीस ठाण्यात मार्गदर्शन शिबिर.संजीव बडोले प्रतिनिधी.

नवेगावबांध दि.२१जुलै:-
येथील पोलीस ठाण्यात नक्षल दमन सप्ताहा अंतर्गत परिसरातील गरजू विद्यार्थी तसेच  पोलीस भरती,इतर स्पर्धात्मक परीक्षेचा अभ्यास करणारे विद्यार्थी यांच्याकरिता मार्गदर्शन शिबिराचे आयोजन दिनांक २१ जुलै रोजी गुरुवारला करण्यात आले होते. सदर शिबिरात नवेगावबांध पोलीस ठाण्याचे ठाणेदार सहायक पोलीस निरीक्षक संजय पांढरे,पोलीस उपनिरीक्षक तुकाराम नांगरे, सि ६० पथकाचे पोलीस उपनिरीक्षक मोरखंडे यांनी मार्गदर्शन केले शिबिराला परिसरातील ५० गरजू विद्यार्थी उपस्थित होते. पोलीस स्टेशन स्थित वाचनालयाचा लाभ विद्यार्थ्यांनी स्पर्धा परीक्षेची तयारी करण्यासाठी करावा असे आवाहन ठाणेदार पांढरे यांनी यावेळी उपस्थित विद्यार्थ्यांना केले.