विजय वडेट्टीवार बहुमत मतदानाला मुकले | - KhabarBat™

Breaking

KhabarBat™

२००९ पासून वाचकांच्या सेवेत

०४ जुलै २०२२

विजय वडेट्टीवार बहुमत मतदानाला मुकले |

राज्याच्या विधानसभेच्या आजच्या कामकाजाला सकाळी ११ वाजता सुरुवात झाली.  पण आज काँग्रेसच्या लेटलतीफ आमदारांमुळे महाविकास आघाडीला मोठा धक्का बसला आहे. कारण काँग्रेसचे पाच आमदार आज बहुमत चाचणीला वेळेवर उपस्थित न राहिल्यानं त्यांना मतदानाला मुकावं लागलं आहे. यात राष्ट्रवादी काँग्रेसच्या एका आमदाराचाही समावेश आहे. 


शिरगणतीद्वारे आमदारांची संख्या मोजण्यात आली. त्यातच काही आमदार विधानभवनात कामकाज सुरु झाल्यानंतर पोहचले. सभागृहात अशोक चव्हाण, विजय वडेट्टीवार, संग्राम जगताप, अण्णा बनसोडे, शिरीष चौधरी, धीरज देशमुख, झिशान सिद्धिकी उशीरा पोहचले. विधानभवन परिसरात असूनही वेळेत सभागृहात न पोहचल्याने मतदानासाठी दारं बंद केली.


 विधानसभा अध्यक्षांनी बहुमत ठराव मांडला आणि यावेळी आमदारांची शिरगणती करण्याचे आदेश अध्यक्षांनी दिले. यावेळी शिरगणती सुरू होण्याआधी दोन वॉर्निंग बेल दिल्या जातात. त्यानंतर सभागृहाचे दरवाजे आतून बंद करण्यात येतात. पण काँग्रेसचे आमदार विजय वडेट्टीवार (Vijay wadettiwar ), अशोक चव्हाण (Ashok Chavhan) यांच्यासह काँग्रेसचे पाच आमदार सभागृहाचे दारबंद झाल्यानंतर विधानभवनात पोहोचले. त्यामुळे या आमदारांना बहुमत चाचणीच्या मतदानाला मुकावे लागले आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार संग्राम जगताप देखील उशीरा पोहोचले. त्यामुळे त्यांनाही मतदान करता आलेलं नाही. 


FloorTest #CMEknathShinde #DevendraFadnavis #AssemblySessionLive

संबंधित शोध