चंद्रपूर आयटीआयतील शाहिद अली सय्यद यांची साऊथ अफ्रिका कांगो येथे निवड | - KhabarBat™ | Breaking News in Marathi

Breaking

KhabarBat™ | Breaking News in Marathi

२००९ पासून वाचकांच्या सेवेत | Latest Marathi News | Breaking News in Marathi |

रविवार, जुलै ०३, २०२२

चंद्रपूर आयटीआयतील शाहिद अली सय्यद यांची साऊथ अफ्रिका कांगो येथे निवड |

 आयटीआय चंद्रपूर येथील MAEE ह्या ट्रेड मधील भारतातून एकमेव शाहिद अली सय्यद यांचे विदेशात साऊथ अफ्रिका कांगो येथे निवड

कौशल्य विकास व उद्योजकता महानिर्देशनालय एनएसडीसी दिल्ली (भारत सरकार) यांनी जाहीर केलेल्या भारतातील एकमेव महाराष्ट्रातून आयटीआय चंद्रपूर जिल्हा चंद्रपूर येथील मेकॅनिक ऑटो इलेक्ट्रिकल्स आणि इलेक्ट्रॉनिक्स या ट्रेड मधील शाहिद अली वकील अली सय्यद हा विदेशात साऊथ अफ्रिका कांगो येथे टेक्निशन पदावर काम करीत असल्याचा नमूद केलेला आहे 

आयटीआय चंद्रपूर येथील मेकॅनिक ऑटो इलेक्ट्रिकल्स अँड इलेक्ट्रॉनिक्स या ट्रेडमधील शाहिद अली वकील अली सय्यद रा. इंदिरानगर चंद्रपूर येथील रहिवासी असलेला अत्यंत गरीब कुटुंबात साहिदचे जन्म झाले शाहिद घरातील मोठा मुलगा आहे त्याला दोन भाऊ आहेत आणि वडील व्यवसायांने टाटा सुमो ड्रायव्हर आहे.

वडील अली यांना आपला मुलगा आयटीआयच करावे अशी इच्छा होती शाहिद हा सन 2012 मध्ये दहावी पास झाला आणि आयटीआय चंद्रपूर येथील  फॉर्म भरले आणि त्याला मेकॅनिक ऑटो इलेक्ट्रिकल्स अँड इलेक्ट्रॉनिक्स हा ट्रेड मिळाले आणि साहिदनी अगदी मन लावून मेहनत घेऊन हा एक वर्षी अभ्यासक्रम पूर्ण केला आणि जुलै 2013 मध्ये चांगल्या गुणांनी पास झाला.

आयटीआय चंद्रपूर येथील MAEE ह्या ट्रेड मधील भारतातून एकमेव शाहिद अली सय्यद यांचे विदेशात साऊथ कोरिया कांगो येथे निवड.

शाहिदच्या वंशात एकही व्यक्ती नोकरीवर नाहीत आणि कोणते नातेवाईकांचा मार्गदर्शन नसताना आणि कधीही चंद्रपूर व्यतिरिक बाहेर न पडणारा शाहिद  साता समुद्रापार जाईल अशी त्यांच्या घरच्यांना स्वप्नातही पाहिलेला नव्हते परंतु त्यांचे प्रशिक्षक श्री अमित सुखदेव राघोर्ते शिल्पनिदेशक  यांच्या मार्गदर्शनात व्हिसा काढला होता आणि मुंबई येथून  विदेशातील कंपनी करिता मुलाखत दिले होते.आणि प्रथमत्याची  2015 मध्ये सौदी अरब मस्कट येथे टेक्निशन निवड  पदाकरीता निवड झाली .अरब देशात तो 2015 ते 2018 पर्यंत टेक्निशियन पदावर नामांकित कंपनीमध्ये तो काम करीत होता त्याला त्या वर्षांमध्ये आठ लाखाची पॅकेज होते.

आयटीआय चंद्रपूर येथील MAEE ह्या ट्रेड मधील भारतातून एकमेव शाहिद अली सय्यद यांचे विदेशात साऊथ कोरिया कांगो येथे निवड.
शाहिद अली सय्यद

परंतु शाहिदला विदेशात काम करण्याचा अनुभवाच्या आधारावर 2018 मध्ये दहा लाख पॅकेज असलेल्या Rubamin Sarl Grup साऊथ अफ्रिका कांगोमध्ये ऑटोमोबाईल हेवी इक्विपमेंट टेक्निशियन ह्या पदावर त्याची निवड झाली त्यामुळे त्याच्या कुटुंबात आनंदाचा वातावरण आहे.

त्यामुळे व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण प्रादेशिक कार्यालय नागपूर  आणि संचालनालय ,व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण महाराष्ट्र राज्य आणि आयटीआय चंद्रपूर यांच्याकरिता ही फार मोठी गौरवाची बाब आहे. 


#bba #education #iit #repost #hr #mba #upsc #icpbrasil #electrical #civil #bhfyp #electrician #mechanical #stayhome #gujarat #ssc #engineer #qajobs #tahershabbir #qcjobs #indiangreekgod #a #productionjobs #training #tahershabbirslavetocinema #transformacaodigital #photography #mechanicaljobs #sp #seguranca