आलेख तायवाडे यांना पुण्यातील आर्ट बिटस् महाराष्ट्र " युवा कला गौरव " हा राज्यस्तरीय पुरस्कार जाहीर - KhabarBat™ | Breaking News in Marathi

Breaking

KhabarBat™ | Breaking News in Marathi

२००९ पासून वाचकांच्या सेवेत | Latest Marathi News | Breaking News in Marathi |

मंगळवार, जुलै २६, २०२२

आलेख तायवाडे यांना पुण्यातील आर्ट बिटस् महाराष्ट्र " युवा कला गौरव " हा राज्यस्तरीय पुरस्कार जाहीर

*आलेख तायवाडे यांना पुण्यातील आर्ट बिटस् महाराष्ट्र " युवा कला गौरव " हा राज्यस्तरीय पुरस्कार जाहीर*
" गीतकार, संगीतकार " या कला विभागात हा राज्यस्तरीय पुरस्कार जाहीर झाला असून, आर्ट बिटस् फौंडेशन पुणे कडून युवा कलाकारांना प्रोत्साहन देण्यासाठी हा पुरस्कार ऑनलाईन पध्दतीने प्रदान करण्यात येतो. या पुरस्कारामुळे गीतकार, संगीतकार आलेख तायवाडे यांचे सर्व स्तरातून कौतुक होत आहे.
या पुरस्काराची माहिती देतांना आर्ट बिटस् पुणे या संस्थेचे संस्थापक, संचालक संतोष पांचाळ म्हणाले की एकूण सहा कला विभागात हे पुरस्कार प्रदान करण्यात येतात, त्यासाठी १५ मे ते ३१ जुलै दरम्यान महाराष्ट्रातून अनेक कलाकार आपली माहिती पाठवतात. त्यातून ही निवड करण्यात येते.
आर्ट बिटस् ही संस्था गेली एकवीस वर्षे सातत्याने चित्र, शिल्प, संगीत, अभिनय, नृत्य आणि लोककला आशा सर्वच कला विभागातील कलाक्षेत्रातील कलाकारांना सक्षम व्यासपीठ व प्रोत्साहन देण्यासाठी सातत्याने काम करीत आहे.
या संस्थेच्या माध्यमातून महाराष्ट्रातील तळागाळातील कलाकारांसाठी महाराष्ट्रातील एक सर्वात मोठा डिजिटल मीडिया प्लॅटफॉर्म उपलब्ध दिला आहे. त्यामुळे आपली कला लाखो लोकांपर्यंत पोहचली जाते. यासाठी सर्व स्तरातील कलाकारांनी या संस्थेकडे संपर्क साधावा असे आवाहन आर्ट बिटस् फौंडेशन या संस्थेच्या वतीने करण्यात आले आहे.