अजित पवार भडकले आणि लगेच दीपक जयस्वाल यांचा नाराजीनामा - KhabarBat™

Breaking

KhabarBat™

२००९ पासून वाचकांच्या सेवेत

२९ जुलै २०२२

अजित पवार भडकले आणि लगेच दीपक जयस्वाल यांचा नाराजीनामा

Former City President, Former City President of Nationalist Congress Party

चंद्रपूर | पूर परिस्थितीची पाहणी करण्याकरिता आलेले विरोधी पक्ष नेते अजित पवार भेटीवरून भडकल्यांनंतर माजी नगराध्यक्ष, राष्ट्रवादी कांग्रेसचे माजी शहर अध्यक्ष दीपक जयस्वाल यांनी नाराजीनामा व्यक्त केलाय. #ajitpawar #Chandrapur #Dipakjaiswal

खासदार बाळु धानोरकर यांच्या निवासस्थानाहून गाडीत बसताना अजित पवारांनी दीपक जयस्वाल या ज्येष्ठ पदाधिकाऱ्याला गाडीत बसायची खूण केली होती. मात्र अजित पवार यांनी आपल्याकडे लक्षच दिले नसल्याची तक्रार जयस्वाल यांनी केली. त्यावर 'असं बोलायचं नाही- माझं सर्वांकडे लक्ष असतं' म्हणत पवार रागावले.

चंद्रपूर जिल्ह्यात आलेल्या पूर परिस्थितीची पाहणी करण्याकरिता आलेले अजित दादा पवार आले होते. कांग्रेसचे खासदार बाळू धानोरकर व अपक्ष आमदार किशोर जोरगेवार यांच्या घरी जाऊन त्यांनी भेटी दिल्या. मात्र, स्वतः पक्षाच्या कार्यकर्त्यांना वेळ दिला नाही. सत्कार करीत असता, पवारांच्या शाब्दिक वागण्याने दीपक जयस्वाल दुखावल्या गेले. त्यांनी राष्ट्रवादी कांग्रेस पक्ष सोडण्याचा निर्णय घेतला आहे.

Congress MP Balu Dhanorkar | MLA  Kishore Jorgewar

#ajitpawar #Chandrapur #Dipakjaiswal 

Former City President, Former City President of Nationalist Congress Party