चंद्रपूर:कुत्र्याच्या पायाला भलामोठा दगड बांधून फेकले नदीच्या प्रवाहात:व्हिडीओ व्हायरल - KhabarBat™

Breaking

KhabarBat™

२००९ पासून वाचकांच्या सेवेत

१८ जुलै २०२२

चंद्रपूर:कुत्र्याच्या पायाला भलामोठा दगड बांधून फेकले नदीच्या प्रवाहात:व्हिडीओ व्हायरल

ललित लांजेवार/खबरबात:                                                                                              चंद्रपुरात माणुसकीला काळीमा फासणारी घटना उघडकीस आली आहे.चंद्रपूरच्या बल्लारपूर मधल्या दहेली मध्ये एका पाळीव कुत्र्याच्या पायाला दगड बांधून आणि तोंड तारेने आवरून त्याला वाहत असलेल्या नदीच्या पाण्यात फेकण्याचा प्रयत्न आले. हा प्रकार गावातील एक कुटुंबीयांनी मिळून केल्याचे समोर आले आहे. 

या घटनेमध्ये कुत्र्याचा मृत्यू झाला आहे असे सांगण्यात येत आहे. विशेष म्हणजे हे कृत्य करत असताना तरुणांनी व्हिडिओ बनवला आणि या हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला. पहिल्यांदा हा प्रकार तरुणांनी केला  तो पाळीव कुत्रा असल्याने तो परत तरुणांकडे परत आला.


त्याच परिस्थितीत कुत्र्याला नदीच्या प्रवाहात दुसऱ्यांदा फेकण्याचा प्रयत्न केला.त्यात त्याचा मृत्यू झाला.अतिशय संतापजनक प्रकार बघायला मिळाल्याने प्यार फाउंडेशनकडून या घटनेची तक्रार पोलिसात केली आहे, आता या विरोधात आवाजही  उठायला सुरुवात झाली आहे.