नागपूर परिमंडळात महावितरणची मोहीम:तीन दिवसांत ३७७ वीज चोरांवर कारवाई - KhabarBat™

Breaking

KhabarBat™

२००९ पासून वाचकांच्या सेवेत

०९ जुलै २०२२

नागपूर परिमंडळात महावितरणची मोहीम:तीन दिवसांत ३७७ वीज चोरांवर कारवाई

नागपूर:
महावितरणच्या नागपूर परिमंडळात गेल्या तीन दिवसांत वीजचोरी करणाऱ्या ३७७ जणांविरोधात कारवई करण्यात आली. ही कारवाई पुढेही सुरू राहणार असल्याचा महावितरणचा दावा आहे. महावितरणने ५ जुलै ते ७ जुलैदरम्यान नागपूर शहर मंडळात आकडे टाकणाऱ्या अथवा अवैधरित्या वीज वापरणाऱ्या २०० जणांविरुद्ध कारवाई केली.

उपराजधानीतील सिव्हिल लाईन्स विभागातील ताजनगर, समतानगर, कामगार नगर, इंदोरा, लुंबिनीनगर, शिवनगर, वांजरा या परिसरात तर नंदनवन उपविभागातील हसनबाग, जुनी शुक्रवारी, एस.टी. स्टँड परिसर आणि मॉडेल मिल चाळ येथेही वीज चोरी पकडली गेली.

 गांधीबाग व महाल विभागात प्रत्येको ५५ वीजचोऱ्या पकडल्या, नागपूर ग्रामीणमध्येही वीजचोरी करणाऱ्या १४९ जणांविरुद्ध कारवाई केली गेली, वर्धा जिल्ह्यात ३७ वीज चोरांवर तर उमरेड विभागात ६४ जणांवर कारवाई झाली.