चंद्रपूर जिल्यात पहिला डोज 96.43 टक्के | कोरोना व्हायरस आजार (COVID-19) - KhabarBat™ | Breaking News in Marathi

Breaking

KhabarBat™ | Breaking News in Marathi

२००९ पासून वाचकांच्या सेवेत | Latest Marathi News | Breaking News in Marathi |

रविवार, जुलै १०, २०२२

चंद्रपूर जिल्यात पहिला डोज 96.43 टक्के | कोरोना व्हायरस आजार (COVID-19)

 कोव्हीड लसीकरणामध्ये चंद्रपूर जिल्ह्याने चांगली कामगिरी केली आहे. चंद्रपूर जिल्यात पहिला डोज 96.43 टक्के लोकांनी तर दुसरा डोजचे प्रमाण 82.40 टक्के आहे. दोन वर्षे कोव्हीडमध्ये गेल्यावर आता कोव्हीड व्यतिरिक्त इतरही महत्वाच्या कामावर प्रशासनाने लक्ष द्यावे, अशा सूचना पालक सचिव अनुप कुमार यांनी दलिया देशात कोविड प्रतिबंधात्मक लसीकरण मोहिमे अंतर्गत आतापर्यंत 198 कोटी 51 लाख 77 हजारांपेक्षा जास्त जणांच लसीकरण झालं आहे. यात चंद्रपूर जिल्यात पहिला डोज 96.43 टक्के लोकांनी तर दुसरा डोजचे प्रमाण 82.40 टक्के आहे. शंभर टक्के प्रामण वाढविण्यासाठी गावात / शाळांमध्ये लसीकरणाचे सत्र आयोजित करावे. अशा सूचना त्यांनी दिल्या. 


आरोग्य विभागाचा आढावा घेतांना श्री. अनुप कुमार म्हणाले, पावसाळ्यात जलजन्य आजारांच्या प्रमाणात मोठी वाढ होते. डायरिया, कॉलरा, मलेरीया, डेंग्यू आदी रोगांना प्रतिबंध करण्यासाठी नागरिकांमध्ये जनजागृती करावी. प्राथमिक आरोग्य केंद्र, उपकेंद्र, ग्रामीण रुग्णालय, उपजिल्हा रुग्णालयामध्ये पुरेसा औषधसाठा उपलब्ध राहील, याबाबत नियोजन करून सर्व आरोग्य यंत्रणा सतर्क ठेवावी, असेही त्यांनी सूचित केले.  

Covaxin लस


कोव्हिशिल्ड व्हॅक्सीन


जॉन्सन अॅंड जॉन्सन लस


झायडस कॅडिला लस


नोव्हावॅक्स लस


मॉडेर्ना लस


स्पुतनिक V लस


स्पुतनिक लाइट लस


COVID-19 व्हायरस वेगवेगळ्या लोकांना वेगवेगळ्या प्रकारे प्रभावित करतो. बऱ्याच संक्रमित लोकांमध्ये सौम्य ते मध्यम लक्षणे असतात आणि त्यांना रुग्णालयात दाखल न करता ते बरे होतात.अधिक सामान्य लक्षणे:
ताप येणे
खोकला येणे
थकवा येणे
चव किंवा वास कमी होणे

कमी सामान्य लक्षणे:
घसा खवखवणे
डोकेदुखी
ठणका व वेदना होणे
अतिसार होणे
त्वचेवर पुरळ येणे, किंवा बोटांचे किंवा पायाच्या बोटांचा रंग फिकट होणे
लाल किंवा त्रासदायक डोळे
CoWIN
https://www.cowin.gov.in


If you have experienced any side effect after COVID 19 vaccination, it can be reported on Co-WIN using your registered mobile number.
Registration · ‎Verify a vaccination certificate · ‎Co-WIN Application · ‎CoWIN