स्व. नीलकंठराव शिंदे यांच्या 80 व्या जयंतीनिमित्त गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार, गणवेश वाटप व वृक्षारोपण - KhabarBat™

Breaking

KhabarBat™

२००९ पासून वाचकांच्या सेवेत

०३ जुलै २०२२

स्व. नीलकंठराव शिंदे यांच्या 80 व्या जयंतीनिमित्त गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार, गणवेश वाटप व वृक्षारोपण

शिरीष उगे (भद्रावती प्रतिनिधी)
        : भद्रावती शिक्षण संस्था भद्रावती द्वारा संचालित यशवंतराव शिंदे विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय भद्रावती येथे भद्रावती शिक्षण संस्था भद्रावतीचे संस्थापक तथा माजी आमदार स्वर्गीय नीलकंठराव शिंदे यांच्या 80 व्या जयंतीनिमित्त महाविद्यालयात गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार, गणवेश वाटप व वृक्षारोपण कार्यक्रम आयोजित करण्यात आला . 

      या कार्यक्रमाचे अध्यक्ष डॉक्टर विवेक शिंदे यांनी साहेबांच्या प्रेरणेने शिक्षण क्षेत्रात महाविद्यालयाची प्रगती सदोदित करण्यासाठी आम्ही कटिबद्ध असल्याचे मार्गदर्शन केले.
भद्रावती शिक्षण संस्था भद्रावती चे संस्थापक सचिव तथा माजी आमदार स्वर्गीय श्री नीलकंठराव शिंदे यांच्या 80 व्या जयंतीनिमित्त यशवंतराव शिंदे विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय भद्रावती, डॉक्टर विवेक शिंदे प्रशासकीय सेवा महाविद्यालय भद्रावती यांच्या संयुक्त विद्यमाने गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार, वृक्षारोपण व गरजू गरीब होतकरू विद्यार्थ्यांना गणवेश वितरण व पुस्तक वितरण कार्यक्रम मान्यवरांच्या हस्ते पार पडला .

      जयंती उत्सवाचे अध्यक्ष डॉक्टर विवेक शिंदे, अध्यक्ष भद्रावती शिक्षण संस्था भद्रावती, प्रमुख अतिथी श्री रवींद्र भाऊ शिंदे विद्यमान संचालक तथा माजी अध्यक्ष सीडीसीसी बँक चंद्रपूर, प्राध्यापक डॉक्टर कार्तिक शिंदे सचिव भद्रावती शिक्षण संस्था भद्रावती, प्राचार्य डॉक्टर जयंत वानखेडे, पर्यवेक्षक श्री एम. एस . ताजने प्रामुख्याने व्यासपीठावर उपस्थित होते .
कार्यक्रमाचे अध्यक्ष डॉक्टर विवेक शिंदे यांनी स्वर्गीय श्री नीलकंठराव शिंदे यांच्या कार्याचा गौरव केला व त्यांच्या प्रेरणे संस्थेच्या विकासासाठी कटिबद्ध असल्याचे मार्गदर्शन केले. विद्यार्थ्यांना यशवंत करण्यासाठी आमचे शिक्षक, प्राध्यापक विद्यार्थ्यांना  यथोचित मार्गदर्शन करतात. प्रमुख अतिथी श्री रविभाऊ शिंदे यांनी गरीब व होतकरू विद्यार्थ्यांसाठी श्रीनिवास शिंदे चॅरिटेबल ट्रस्ट सदैव तत्पर आहे. आपण आपल्या परिसरातील गरजवंत विद्यार्थ्यांना आमच्याकडे पाठवावे संस्था निश्चितच मदत करेल असे आश्वासन दिले. आपण त्यांना  प्रोत्साहित करावे असे मार्गदर्शन केले.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक महाविद्यालयाचे प्राचार्य डॉक्टर जयंत वानखेडे सर यांनी केले. कनिष्ठ महाविद्यालय व विद्यालय तालुक्यातील निकालात सदैव अग्रेसर  असते.आपण गुणवंत विद्यार्थ्यांकडून प्रेरणा घ्यावी असे मनोगत व्यक्त केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉक्टर सुधीर मोते यांनी केले, तर आभार प्रदर्शन श्री महादेव ताजणे यांनी केले. त्यानंतर शालेय परीसरात मान्यवरांच्या हस्ते वृक्षारोपण करण्यात आले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी प्रा. डाॅ. ज्ञानेश हटवार, किशोर ढोक रमेश चव्हाण, आत्माराम देशमुख, सतिश नंदनवार, तसेच प्राध्यापक ,शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी यांनी सहकार्य केले.