धक्कादायक:कारंजाच्या आठवडी बाजारात विजेच्या धक्क्याने २ गाईचा जागीच मृत्यू - KhabarBat™ | Breaking News in Marathi

Breaking

KhabarBat™ | Breaking News in Marathi

२००९ पासून वाचकांच्या सेवेत | Latest Marathi News | Breaking News in Marathi |

सोमवार, जुलै १८, २०२२

धक्कादायक:कारंजाच्या आठवडी बाजारात विजेच्या धक्क्याने २ गाईचा जागीच मृत्यूकारंजा (घाडगे)/जगदीश बाबू:
 रविवार दिनांक 17. 7.2022 ला कारंजा येथील आठवडी बाजारात विद्युत प्रवाह आणि रात्री आठच्या दरम्यान दोन आईचा जागीच मृत्यू झाला. रविवारला कारंजा येथे आठवडी बाजार भरत असतो. त्या निमित्याने भाजीपाल्याचा व्यापार करणारे व्यापारी आपले पाल ठोकून भाजीचा व्यवसाय करीत असतात. 

 तालुक्यातून बरेच ग्रामीण भागात नागरिक बाजार करण्यासाठी कारंजाला येतात. आठवडी बाजारात व्यापाराची पाल टाकून व्यवसाय करीत असताना पाल लावण्याचा खिळा जमिनीच्या वायरिंग वर ठोकल्या गेल्या मुळे  बाजूला विद्युत पोल असल्यामुळे त्या पोलची वायरिंग जमिनीतून असल्यामुळे त्या वायरिंगवर त्या तालपत्रीचा खिळा आल्यामुळे त्या लोखंडी रॉडला करंट आला रात्रीचे लाईट त्या पोल  वरील सुरू असल्यामुळे रात्री आठवडी बाजारात गाई फिरत होत्या. 

आणि त्या ताडपत्रीच्या  रॉडला गाईचा स्पर्श झाला आणि त्या गाईला करंट लागून जागीच मृत्यू झाला.  त्याच प्रमाणे दुसरी गाय सुद्धा त्या गाई  जवळ गेली तिचा पण जागीच मृत्यू झाला. रात्रीच्या वेळेस नागरिक जर त्या दुकानाजवळ गेले  असते तर मोठी जीवित हानी झाली असती बोलल्या जात आहे.


weekly market Karanja, electrocution and death