तरुणांनो, विदर्भासाठी लिहते व्हा! - KhabarBat™ | Breaking News India

Breaking

KhabarBat™ | Breaking News India

News Website | Breaking News | latest Update

रविवार, जून १२, २०२२

तरुणांनो, विदर्भासाठी लिहते व्हा!

विदर्भाच्या आर्थिक, सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि सर्वच बाजूने समतोल आणि विकास साधण्याच्या दृष्टीने विदर्भाची मागणी मागील अनेक वर्षांपासून होत आहे. या मागणीला साहित्यातून बळ देण्याच्या दृष्टीने ज्येष्ठ समाजसेविका, आदिवासी आणि कामगार नेत्या अड. पारोमिता गोस्वामी आणि डॉ. कल्याणकुमार यांनी "द विदर्भ गॅजेट" हे ऑनलाइन माध्यम मागील वर्षी ऑगस्ट महिन्यात सुरू केले.

या माध्यमाला आता वर्ष होऊ घातला आहे. यानिमित्त 18 ते 25 वर्षे वयोगटातील तरुणांना लिहिते करण्याच्या दृष्टीने आणि स्वतंत्र विदर्भाची चळवळ आणखी वृध्दिंगत व्हावी, यासाठी लेखन स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. यात विदर्भाचा इतिहास, भूगोल, राजकारण, विदर्भातील सामाजिक चळवळी, विदर्भातील वन्यजीव यासह विदर्भाच्या कोणत्याही पैलूंना घेऊन लेखन करता येणार आहे. लेख, लघुकथा, कविता आदी तीन वर्गवारीमध्ये पुरस्काराने गौरविण्यात येणार आहे. 
१ ) लेख ( ५००-८०० शब्द ) २ ) लघुकथा आणि निबंध ( २५०० शब्दांपर्यंत ) ३ ) कविता ( ३ कविता पर्यंत ) असावी. 
लेख पाठविण्याची अंतिम तारीख : १५ जुलै २०२२ असून, खालील ईमेलवर पाठवावे.  [email protected]