सहा वाघ एका रांगेत जात असल्याचे दृश्य पाहून पर्यटक झाले खुश; व्हिडिओ वायरल - KhabarBat™ | Breaking News India

Breaking

KhabarBat™ | Breaking News India

News Website | Breaking News | latest Update

रविवार, जून १२, २०२२

सहा वाघ एका रांगेत जात असल्याचे दृश्य पाहून पर्यटक झाले खुश; व्हिडिओ वायरलविदर्भातील जगप्रसिद्ध व्याघ्र प्रकल्पामध्ये आज 12 जून रोजी व्याघ्र दर्शनासाठी गेलेल्या पर्यटकांसाठी एक पर्वणीच ठरली. पर्यटकांच्या जिप्सी जवळून एक दोन नव्हे तर तब्बल सहा वाघ एका मागे एक एका रांगेमध्ये जात असल्याचा व्हिडिओ पर्यटकांनी टिपला आहे. हा दीड दुर्मिळ क्षण बघून पर्यटक खुश झाले आहेत.
विदर्भातील उमरेड आणि ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्प वाघासोबतच अन्य वन्य प्राण्यांसाठी प्रसिद्ध आहे. घनदाट वनराई च्या कुशीत वास्तव्य करणारा वाघ पर्यटकांना नेहमीच एक आनंद देऊन जातो. आज 12 जून रोजी दुपारच्या सुमारास सफारीसाठी गेलेल्या पर्यटकांसाठी एक पर्वणीच ठरली. तब्बल सहा वाघ त्यांच्या जिप्सी जवळून एका रांगेमध्ये रस्ता ओलंडताचा व्हिडिओ अनेकांनी आपल्या कॅमेरा आणि मोबाईल मध्ये घेतला. हा व्हिडीओ सोशल मीडियावर चांगलाच चर्चेत आलेला आहे. 

मात्र सदर व्हिडियो नेमका कोणत्या अभयारण्यातील आहे हे अद्यापही स्पष्ट झालेले नाही. काही पत्रकारांनी हा व्हिडिओ शेअर केलेला आहे. काहींच्या मते हा उमरेड तर काहींच्या मते ताडोबातील असल्याचे सांगण्यात आले. 

Tourists were happy to see six tigers moving in a line; Video viral

#tigers #tiger🐯 #tigerians #tigershroff #tigercub #gilbertomiranda #tigertiger #tigerfanworld #bengaltiger #easytigris


#wildlife_shots #wildlife_india #instaanimal #conservation #wildliferehab #wildlifephotography #animalsofinstagram #wildlifeconservationthis #bigcat #tigerking