०६ जून २०२२
Home
चंद्रपूर
चंद्रपूर जिल्ह्यातील प्रदूषणासंदर्भात थर्ड पार्टी ऑडिट करणार : राष्ट्रवादीच्या नेत्या सुप्रिया सुळे यांची माहिती
चंद्रपूर जिल्ह्यातील प्रदूषणासंदर्भात थर्ड पार्टी ऑडिट करणार : राष्ट्रवादीच्या नेत्या सुप्रिया सुळे यांची माहिती
चंद्रपूर जिल्ह्यातील प्रदूषणासंदर्भात थर्ड पार्टी ऑडिट करणार : राष्ट्रवादीच्या नेत्या सुप्रिया सुळे यांची माहिती
चंद्रपूर जिल्ह्यामध्ये वनसंपदा मोठ्या प्रमाणात आहे ताडोबामध्ये जगातून लोक पर्यटनासाठी येतात मात्र शहरात प्रवेश करताच प्रदूषणाची समस्या मोठ्या प्रमाणात जाणवते त्यामुळे स्थानिक नागरिकांचे आरोग्य बिघडत आहे यावर तोडगा काढण्यासाठी थर्ड पार्टी ऑडिट करण्यात येईल अशी माहिती राष्ट्रवादी काँग्रेसचे नेत्या खासदार सुप्रिया सुळे यांनी दिली. (NCP Supriya sule)
आज सहा जून रोजी खासदार सुप्रियाताई सुळे यांनी चंद्रपूर जिल्ह्यातील ताडोबा अभयारण्याला भेट दिल्यानंतर शहरातील बाबासाहेब आंबेडकर यांच्या पूर्णाकृती पुतळ्याला माल्यार्पण करून अभिवादन केले.
चंद्रपूर येथील छत्रपती शिवाजी महाराज चौक परिसरात शिवराज्याभिषेक दिनाच्या निमित्ताने शिवरायांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करुन वंदन केले.
यावेळी खासदार सुप्रिया सुळे यांनी सांगितले की चंद्रपूर जिल्ह्यामध्ये वन्यजीव मानव संघर्ष मोठ्या प्रमाणात आहे. पर्यटन आणि मानव संरक्षण या दोन्ही बाबी महत्त्वाच्या आहेत. पर्यावरणाच्या रक्षणासाठी झाडे आणि प्राणी महत्वाचे घटक आहेत. चंद्रपूर शहरातील प्रदूषण कमी व्हावे आणि त्यावर उपाय करण्याच्या दृष्टीने राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या माध्यमातून थर्ड पार्टी ऑडिट केले जाईल त्यासाठी चंद्रपूर जिल्ह्यातील महत्त्वाच्या पदक पदाधिकाऱ्यांसोबत बैठक घेऊन चर्चा केली जाईल अशी माहिती खासदार सुप्रिया सुळे यावेळी दिली. यावेळी चंद्रपूर जिल्ह्याचे अध्यक्ष राजेंद्र वैद्य, राष्ट्रवादी काँग्रेसचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.
https://youtu.be/PBNnXQPWaME
Third party will conduct audit regarding pollution in Chandrapur district: Information of NCP leader Supriya Sule
खबरबात
भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.
- प्रकाशक
ईमेल [email protected]
[email protected]
