आमदार सुधीर मुनगंटीवार यांच्या महावितरणला सूचना | - KhabarBat™ | Breaking News India

Breaking

KhabarBat™ | Breaking News India

News Website | Breaking News | latest Update

शनिवार, जून १८, २०२२

आमदार सुधीर मुनगंटीवार यांच्या महावितरणला सूचना |

थकित विज बिलापोटी पथदिव्‍यांचे विज कनेक्‍शन कापणे थांबवा, आमदार सुधीर मुनगंटीवार यांच्या महावितरणला विश्रामगृहातील बैठकीत सूचना


चंद्रपूर |  जिल्‍हयात अनेक ग्राम पंचायत क्षेत्रात पथदिव्‍यांचे विज कनेक्‍शन थकित विजबिलापोटी खंडीत केले जात आहेत. जिल्‍हयातील ११ तालुके मानवविकास निर्देशांकात मागे आहे. अशा परिस्‍थीतीत थकित विज बिलापोटी पथदिव्‍यांचे विज कनेक्‍शन कापणे ही बाब अन्‍यायकारक आहे. ही मोहीम त्‍वरीत थांबविण्‍यात यावी, अन्‍यथा आम्‍हाला आंदोलनासाठी रस्‍त्‍यावर यावे लागेल, असा ईशारा विधीमंडळ लोकलेखा समितीचे प्रमुख तथा माजी अर्थमंत्री आ. सुधीर मुनगंटीवार (Sudhir Mungantiwar) यांनी दिला. 


आ. सुधीर मुनगंटीवार यांनी दिनांक १८ जून रोजी विश्रामगृह चंद्रपूर येथे महावितरणच्‍या अधिका-यांसह बैठक घेत आढावा घेतला. या बैठकीला मुख्‍य अभियंता श्री. देशपांडे, अधिक्षक अभियंता श्रीमती चिवंडे, कार्यकारी अभियंता महेश तेलंग, सुहास पडोळे, उपअभियंता यांच्‍यासह भाजपा नेते रामपाल सिंह, नामदेव डाहूले, राजीव गोलीवार, श्रीनिवास जंगमवार, राकेश गौरकार, सुभाष गौरकार आदींची प्रामुख्‍याने उपस्थिती होती. जिल्‍हयातील किती ग्राम पंचायतींचे पथदिव्‍यांचे विज कनेक्‍शन खंडीत करण्‍यात आले आहे. थकित विज बिलापोटी किती रक्‍कम शिल्‍लक आहे, याआधी पथदिव्‍यांच्‍या विजबिलाचा भरणा कोण करायचे अशी विचारणा आ. सुधीर मुनगंटीवार यांनी केली. 

 यासंदर्भात आ. मुनगंटीवार यांनी ग्रामविकास मंत्री श्री हसन मुश्रीफ़ यांच्याशी दुरध्वनी द्वारे चर्चा केली असता त्यांनी पुढील आठवड्यात बैठक घेण्याचे आश्वासन दिले.


पेज नेव्हिगेशन