शेमारू मराठीबाणा वाहिनीवर अनुभवा थेट पंढरपूरच्या विठ्ठल मंदिरात रंगलेला महाकीर्तन सोहळा - KhabarBat™ | Breaking News India

Breaking

KhabarBat™ | Breaking News India

News Website | Breaking News | latest Update

शनिवार, जून १८, २०२२

शेमारू मराठीबाणा वाहिनीवर अनुभवा थेट पंढरपूरच्या विठ्ठल मंदिरात रंगलेला महाकीर्तन सोहळा
टेलिव्हिजन च्या इतिहासात पहिल्यांदाच शेमारू मराठीबाणा वाहिनीवर अनुभवा थेट पंढरपूरच्या विठ्ठल मंदिरात रंगलेला महाकीर्तन सोहळायंदा अवघ्या महाराष्ट्रात आनंदी वातावरण आहे कारण तब्बल दोन वर्षे खंडित झालेली वारी अधिक उत्साह आणि उर्जेने पंढरपूरकडे प्रस्थान करत आहे आणि हा उत्साह द्विगुणित करत, कीर्तनाच्या माध्यमातून पंढरपूर मंदिराचं दर्शन घडवण्यासाठी शेमारू मराठीबाणा वाहिनी घेऊन आली आहे महाकीर्तन सोहळा. या सोहळ्याचा पहिला भाग रविवारी १९ जून ला दुपारी १२ वा. आणि संध्याकाळी ६ वा.प्रक्षेपित होणार आहे. वारी न अनुभवता येणाऱ्या प्रत्येक भक्तासाठी ही अभुतपूर्व संधी आहे.  #ShemarooMeappपंढरपूरच्या प्राचीन मंदिरात रंगलेल्या महाकीर्तन सोहळ्याच्या निमित्ताने महाराष्ट्रातील प्रख्यात कीर्तनकारांचे कीर्तन पहिल्यांदाच प्रेक्षकांच्या भेटीला शेमारू मराठीबाणा वाहिनी लवकरच आणणार आहे. त्यापुर्वी श्री.ह.भ.प.तात्या महाराज चौगुले, पंढरपूरकर यांच्या कीर्तनाचा दैवी अनुभव रविवार १९ जून रोजी दुपारी १२ वा. आणि संध्याकाळी ६ वा. घेता येणार आहे.

प्रत्यक्ष माऊलीच्या मंदिरात रंगलेलं हे कीर्तन श्री.ह.भ.प.तात्या महाराज चौगुले, पंढरपूरकर यांनी सांगितले असून याचा आस्वाद महाराष्ट्रातील घराघरात पोहोचवणारी शेमारू मराठीबाणा पहिलीच वाहिनी आहे.ह.भ.प.तात्या महाराज चौगुले, पंढरपूरकर हे पिढीजात वारकरी. लहानपणापसून आळंदीमध्ये वारकरी शिक्षण घेऊन निरंतन लोकसेवेचं, समाज प्रबोधनाचे व्रत त्यांनी अंगिकारले आहे. आळंदी येथे संतसाहित्याचा अभ्यास केलेल्या, वाराणसी येथून संस्कृतमध्ये पदवीधारक असलेल्या ह.भ.प.तात्या महाराज चौगुले, पंढरपूरकर यांनी देहू परंपरेचा वारसा पुढे चालू ठेवला आहे.ऐन आषाढाच्या आगमनाआधी मराठीबाणा वाहिनीने आणलेली ही आषाढवारीची विशेष भेट अवघ्या महाराष्ट्रासाठी दुग्धशर्करा योग आहे. कीर्तनाची परंपरा असलेल्या महाराष्ट्राला, मराठी संस्कृती जपणाऱ्या प्रत्येकाला 'शेमारू मराठीबाणा'कडून ही आषाढाची विशेष भेट रविवार १९ जून ला दुपारी १२ वा. आणि संध्याकाळी ६ वा अनुभवता येणार आहे.