जिल्हा परिषद प्राथमीक जटपूरा शाळा चंद्रपूर येथे शाळा प्रवेशोत्सव; नवागत विद्यार्थ्यांचे स्वागत - KhabarBat™ | Breaking News India

Breaking

KhabarBat™ | Breaking News India

News Website | Breaking News | latest Update

गुरुवार, जून ३०, २०२२

जिल्हा परिषद प्राथमीक जटपूरा शाळा चंद्रपूर येथे शाळा प्रवेशोत्सव; नवागत विद्यार्थ्यांचे स्वागत

जिल्हा परिषद प्राथमीक जटपूरा शाळा चंद्रपूर येथे शाळा प्रवेशोत्सव; नवागत विद्यार्थ्यांचे स्वागत


जिल्हापरिषद जटपूरा प्राथमिक शाळेत शैक्षणिक सत्राचा शुभारंभ करण्यात आला. पहिलीतील नवागतांचे स्वागत लेझीम पथकाने व पुष्प देवून करण्यात आले. याप्रसंगी शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष , पदाधिकारी तसेच विद्यार्थ्याचे पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते. फीत कापून कार्यक्रमाचा शुभारंभ करण्यात आला. पुस्तके वाटप करून पुस्तकदिन साजरा करण्यात आला .

तसेच गणवेश वाटप करण्यात आले . करुन शाळा पूर्व तयारी मेळाव्याला सुरुवात करून करण्यात आली . शाळेच्या मुख्याध्यापक शालुताई भोंगळे यांनी सातही स्टालची माहीती पालकांना विद्यार्थ्यांना समजावून सांगितली. कार्यक्रमाच्या आयोजनासाठी सहायक शिक्षिका सौ. वासंतीमाला दुरगडे यांनी सहकार्य केले .