भारताच्या राष्ट्रपतीपदाचे उमेदवार जाहीर - KhabarBat™

Breaking

KhabarBat™

२००९ पासून वाचकांच्या सेवेत


२१ जून २०२२

भारताच्या राष्ट्रपतीपदाचे उमेदवार जाहीर


भारतीय जनता पार्टीनं राष्ट्रपती निवडणुकीसाठी उमेदवार जाहीर केला आहे. झारखंडच्या माजी राज्यापाल द्रौपदी मुर्मू यांना उमेदवारी देण्यात आली आहे. भाजपनं रामनाथ कोविंद यांना मागील निवडणुकीत उमेदवारी दिली होती. आता यावेळी आदिवासी महिलेला संधी देण्याचा निर्णय भाजपकडून घेण्यात आला आहे. भाजप अध्यक्ष जे.पी. नड्डा यांनी यासंदर्भातील घोषणा केली. भाजपनं राष्ट्रपती पदाचा उमेदवार जाहीर करण्यापूर्वी बैठक घेतली आणि उमेदवार जाहीर केला. त्यापूर्वी विरोधी पक्षांनी यशवंत सिन्हा यांची उमेदवारी घोषित केली आहे. राष्ट्रपती पदासाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्याची तारीख २९ जून आहे. भाजपकडून राष्ट्रपती पदाची निवडणूक बिनविरोध करण्याचे प्रयत्न करण्यात येत होते. मात्र, विरोधी पक्षांनी देखील उमेदवार जाहीर केला आहे. बिनविरोध निवडणुकीसंदर्भातील चित्र येत्या काळात स्पष्ट होईल.


राष्ट्रपतीपदासाठी विरोधी पक्षाचे उमेदवार म्हणून माजी केंद्रीय मंत्री व टीएमसी नेते यशवंत सिन्हा यांच्या नावाला मंजुरी देण्यात आली आहे. राष्ट्रवादीचे नेते शरद पवार यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या विरोधी पक्षांच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला आहे.