चंद्रपुरात मंगळवारी रात्री खळबळजनक घटना | एका तरुणाची आत्महत्या, तर एकाची हत्या - KhabarBat™ | Breaking News India

Breaking

KhabarBat™ | Breaking News India

News Website | Breaking News | latest Update

मंगळवार, जून १४, २०२२

चंद्रपुरात मंगळवारी रात्री खळबळजनक घटना | एका तरुणाची आत्महत्या, तर एकाची हत्याचंद्रपूर (Chandrapur) | शहरातील नगीनाबाग येथे किरायाने रुम करून राहणाऱ्या युवकाने गळफास घेत आत्महत्या केल्याची घटना दि. १४ जुन ला सायंकाळी ६ ते ७ वाजताच्या सुमारास उघडकिस आली. तर त्यानंतर काही तासातच हरातील मध्यभागी स्थित ज्यूबली शाळेच्या आवारात एका इमारतीवर 22 वर्षीय युवकाचा मृतदेह मिळाल्याने परिसर हादरून गेला. 


गोंडपिपरी (Gondpimpari) तालुक्यातील रहिवासी सारंग मोरेश्वर येलमुले यांनी चंद्रपूर शहरातील नगीना बाग जवळ किरायाने रुम करुन राहत होता. सारंग हा स्पर्धापरीक्षेची तयारी करत होता. आज दि. १४ जुन ला सायंकाळी ६ तेे ७  वाजताच्या सुमारास गळफास घेऊन आत्महत्या केली.


आत्महत्येच कारण अद्याप पर्यंत कळू शकले नाही. घटनास्थळी पोलिस दाखल होत पंचनामा केला असून शव ताब्यात घेत शवविच्छेदनासाठी पाठवले आहे. पुढील तपास पोलीस करीत आहेत.


 ज्यूबली शाळेच्या आवारात शासकीय इमारतीच्या छतावर 22 वर्षीय युवकाच्या मृतदेहाजवळ दारूच्या बॉटल्स आढळून आल्या आहे, मारेकऱ्यांनी दारू पिऊन त्या युवकाची हत्या केली असल्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला असून मृतदेहाच्या डोक्यावर दारूच्या बॉटल्स फोडल्याची खूण दिसत असून मृतदेहाचे हात व पाय सेलो टेप ने चिपकविण्यात आले आहे. पोलीस मृतक युवकाची ओळख पटवीत असून तपास करीत आहे.

murder chandrapur 

#chandrapur #nagpur #pune #maharashtra #marathi #akola #nashik #aurangabad #gadchiroli #marathimulgi #mumbai #wardha #jalgaon #satara #marathistatus #amravati #mimarathi #parbhani #mh #ig #vidarbha #mumbaikar #india #kolhapur #repost #baramati #satarkar #lovequotes #khamgaon #buldhana

संबंधित शोध