1 जुलैला फडणवीस यांचा शपथविधी होणार - KhabarBat™ | Breaking News India

Breaking

KhabarBat™ | Breaking News India

News Website | Breaking News | latest Update

बुधवार, जून २९, २०२२

1 जुलैला फडणवीस यांचा शपथविधी होणार


#DevendraFadnavis #BJP #Shivsena 

देवेंद्र फडणवीस यांनी घेतली राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांची भेट

विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांच्यासह भाजपच्या (BJP) प्रमुख नेत्यांनी राज्यपाल भगतसिंग कोश्यारी (Governor Bhagat Singh Koshyari) यांची भेट घेतली. या भेटीमध्ये भाजपने महाविकासआघाडी सरकार अल्पमतात असून लवकरात लवकर बहुमत चाचणी घ्यावी, अशी मागणी केली आहे. भाजपने राज्यपालांना लिहिलेल्या पत्रामध्ये वेगवेगळे मुद्दे उपस्थित करण्यात आले आहेत. तसंच या पत्रासोबत सुप्रीम कोर्टाच्या निकालांचा दाखलाही देण्यात आल्याचं फडणवीस म्हणाले. त्या नुसार राज्यपालांनी मुख्यमंत्र्यांना पत्र पाठवून बहुमत सिद्ध करण्यासाठी सुचविले आहे. एकूणच राज्यामध्ये एक जुलै रोजी देवेंद्र फडणवीस नवे मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतील, अशी माहिती सूत्रांनी दिली

देवेंद्र फडणवीस म्हणाले की आम्ही महाराष्ट्र सरकारला पत्र दिले असून शिवसेनेचे 39 आमदार राष्ट्रवादी काँग्रेस, काँग्रेस सरकारसोबत राहू इच्छित नसल्याचे सांगत आहेत. यावरून एमव्हीए सरकारने बहुमत गमावल्याचे दिसून येते. आम्ही राज्यपालांना विनंती केली आहे की त्यांनी तत्काळ मुख्यमंत्र्यांना फ्लोअर टेस्टद्वारे बहुमत सिद्ध करण्याचे निर्देश द्यावे. दरम्यान 8 अपक्ष आमदारांनीही महाराष्ट्राच्या राज्यपालांना मेल पाठवून लवकरात लवकर फ्लोअर टेस्ट करण्याची मागणी केली आहे.विधानसभेतील विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी आज राज्यपाल भगतसिंग कोश्यारीजी यांची राजभवन मुंबई येथे भेट घेतली. यावेळी भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांतदादा पाटील, ज्येष्ठ नेते सुधीर मुनगंटीवार, विधानपरिषदेतील विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर, गिरीश महाजन, आशीष शेलार आदी नेते उपस्थित होते. यावेळी महाविकास आघाडी सरकारला बहुमत सिद्ध करण्याचे निर्देश राज्यपालांनी द्यावे, अशी मागणी करण्यात आली. या पत्रात मांडलेले महत्त्वाचे मुद्दे असे :

- भाजपा-शिवसेनेने एकत्रितपणे निवडणुका लढविल्या होत्या. परंतू निवडणुकीनंतर शिवसेनेने राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेससोबत सरकार स्थापन केले.

- शिवसेनेत गेल्या 8-9 दिवसांपासून अंतर्गत संघर्ष उफाळून आला आहे आणि त्यांना राष्ट्रवादी आणि काँग्रेससोबत आता आघाडी नको आहे. शिवसेनेचे 39 आमदार ही आघाडी संपुष्टात येण्याच्या बाजूने आहेत. त्यामुळे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी विधानसभेत बहुमत गमावले आहे.

- दुसरीकडे शिवसेनेच्या या आमदारांना धमक्या दिल्या जात आहेत. त्यांचे 40 मृतदेह गुवाहाटीतून परत येतील, असे जाहीरपणे राज्यसभा सदस्य संजय राऊत सांगत आहेत. शिवाय शिवसेनेचे इतरही नेते अशाच प्रकारची धमकीयुक्त भाषा वापरत आहे. यासंदर्भात सर्व पुरावे सोबत जोडले आहेत.
- संसदीय लोकशाहीत सभागृहातील बहुमत ही सर्वोच्च बाब असल्याने आणि त्याशिवाय, ते सरकार अस्तित्त्वात राहू शकत नसल्याने तातडीने मुख्यमंत्र्यांना बहुमत सिद्ध करण्यास सांगावे, ही माझी राज्यपालांकडे विनंती आहे. यासंदर्भात सर्वोच्च न्यायालयाचे विविध दाखले सुद्धा देण्यात आले आहेत.

BJP’s Devendra Fadnavis has handed a letter to the governor seeking a floor test.
#DevendraFadnavis #MaharashtraPolitcalCrisis #Maharashtra