ऐतिहासिक गोंडकालीन वास्तु स्थळऻ योगशिबिर - KhabarBat™

Breaking

KhabarBat™

२००९ पासून वाचकांच्या सेवेत


२१ जून २०२२

ऐतिहासिक गोंडकालीन वास्तु स्थळऻ योगशिबिर

जागतिक योग दिनी इको-प्रो व भारतीय पुरातत्व विभागाच्या वतीने अंचलेश्र्वर गेटजवळील गोंडकालीन समाधीस्थळी योग शिबिरजागतिक योग दिनानिमित्त दिवशी आज 21 जून रोजी गोंडराजे यांचे समाधिस्थळ, चंद्रपुर किल्ला परकोट येथे इको प्रो संस्था व भारतीय पुरातत्व विभागाच्या वतीने योग शिबिर आयोजित करण्यात आले होते.

अंचलेश्वर मंदिर लगत असलेल्या ऐतिहासिक वास्तु असलेले गोंडराजे यांचे समाधिस्थळ व शहरातील किल्ला परकोटाच्या भिंति, बुरुजावरुन योग करीत आरोग्यासाठी योग, प्राणायाम व व्यायामाचे महत्व तर शहरातील ऐतिहासिक वारसा जतन व संवर्धन कार्यात नागरिकांचा प्रत्यक्ष सहभाग मिळावा उपक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.आज पहाटे गोंडराजे समाधिस्थळ, रामाळा तलाव लगत बगड़ खिड़की, बुरुज 4, बुरुज 5 व किल्लाच्या भिंतिवरुन, इको-प्रो कार्यकर्ते यांनी संस्थेचे अध्यक्ष बंडू धोतरे, पुरातत्व विभागाचे शाहिद अख्तर यांचे नेतृत्वात योग दिनाचे कार्यक्रम घेतला. यावेळेस संस्थेचे नितिन रामटेके, धर्मेंद्र लुनावत, संजय सब्बनवार, अनिल अडगुरवार, विनोद दुधनकर, ओमजी वर्मा, सुनील पाटिल, सुनील मिलाल, मनीष गावंडे, राजू काहीलकर, सुधीर देव उपस्थित होते.