मुख्याध्यापकांनी नव्या जोमाने गुणवत्तेसाठी काम करावे : बिडीओ राजनंदिणी भागवत - KhabarBat™

Breaking

KhabarBat™

२००९ पासून वाचकांच्या सेवेत


१० जून २०२२

मुख्याध्यापकांनी नव्या जोमाने गुणवत्तेसाठी काम करावे : बिडीओ राजनंदिणी भागवत
मुख्याध्यापकांनी नव्या जोमाने गुणवत्तेसाठी काम करावे


शालापूर्व तयारी नियोजन सभेत बिडीओ राजनंदिणी भागवत यांचे आवाहन

" सभेत स्वच्छ शाळा , निपुण भारत, शा पो आहार, पाठ्यपुस्तके वाटप, गणवेश वाटप, पाठ्यपस्तक वाटप, सेवा हमी कायदा, सखी महिला मंच, यु डायस स्टुडंट्स पोर्टल, आधार अपडेट, शाळाबाह्य विद्यार्थी प्रबंध पोर्टल, डीबिटी, वृक्षारोपण इत्यादी विषयांवर उहापोह करण्यात आला."

पंचायत समिती, नागपूर अंतर्गत जिल्हा परिषद व खाजगी अनुदनित प्राथमिक व उच्च प्राथमिक शाळांच्या मुख्याध्यापकांची "शालापूर्व तयारी नियोजन सभा" पंचायत समितीच्या गट विकास अधिकारी राजनंदिणी भागवत यांच्या अध्यक्षतेखाली व गट शिक्षणाधिकारी राजश्री घोडके , विस्तार अधिकारी सर्वश्री रामराव मडावी व शरद भांडारकर, शाळा संचालक राजाभाऊ टाकसाळे यांचे प्रमुख उपस्थितीत सेंट पॉल स्कूल, हुडकेश्वर येथे संपन्न झाली.

सर्वप्रथम मान्यवरांच्या हस्ते सरस्वती मातेच्या प्रतिमेचे पूजन व दीप प्रज्वलन करण्यात आले. उपस्थित सर्व मान्यवरांचे पुष्पगुच्छ देवून स्वागत करण्यात आले.

सभेचे प्रास्ताविकातून प्र. शिक्षण विस्तार अधिकारी शरद भांडारकर यांनी शाळापूर्व तयारी नियोजन सभेची रूपरेषा सांगितली.

प्रास्ताविका नंतर गट शिक्षणाधिकारी राजश्री घोडके यांनी महत्वाच्या विषयावर मुद्देसूद माहिती देवून नवीन शैक्षणिक सत्राच्या शुभेच्छा देऊन आपले मनोगतातून शिष्यवृत्ती परीक्षा सराव वर्ग, सेतू अभ्यास , अभ्यासक्रमाचे नियोजन इत्यादींबाबत माहिती दिली.

गट विकास अधिकारी राजनंदिणी भागवत यांनी कोविड परिस्थितीचा मागोवा घेवून नवीन शैक्षणिक सत्रात मुख्याध्यापकांनी गुणवत्ता वाढीसाठी नव्या जोमाने कामाला प्रारंभ करावा असे आवाहन करून वृक्षारोपण , पाठ्युस्तकांचे वाटप, गणवेश वाटप इत्यादीचे सूक्ष्म नियोजन करावे असे सांगितले.

शिक्षण विस्तार अधिकारी रामराव मडावी यांनी शिक्षण उपसंचालक वैशाली जामदार व जिप प्राथमिक शिक्षणाधिकारी रोहिणी कुंभार यांनी जिल्हास्तावर दिलेल्या सूचनांचे सविस्तर वाचन करून मुख्याध्यापकांना अनुपालन करण्याचे निर्देश दिले.

सभेच्या सर्व विषयांचा सखोल आढावा घेवून मुख्याध्यापकांनी विचारलेल्या सर्व प्रश्नांची उत्तरे देण्याचा प्रयत्न शिक्षण विस्तार अधिकारी शरद भांडारकर यांनी केला.

सभेचे सूत्र संचालन व आभार प्रदर्शन मुख्याध्यापिका आशा दावळे यांनी केले. सभेच्या यशस्वितेसाठी सर्व केंद्रप्रमुख, सेंट पॉल शाळेचे मुख्याध्यापक व कर्मचारी वृंद यांनी सहकार्य केले.
Headmasters should work for quality with renewed vigor: