एकनाथ शिंदे यांनी बंड का केलं? शिवसेनेनं घेतला हा सर्वात मोठा निर्णय - KhabarBat™ | Breaking News India

Breaking

KhabarBat™ | Breaking News India

News Website | Breaking News | latest Update

मंगळवार, जून २१, २०२२

एकनाथ शिंदे यांनी बंड का केलं? शिवसेनेनं घेतला हा सर्वात मोठा निर्णय


आम्ही बाळासाहेबांचे कट्टर शिवसैनिक आहोत... बाळासाहेबांनी आम्हाला हिंदुत्वाची शिकवण दिली आहे.. बाळासाहेबांचे विचार आणि धर्मवीर आनंद दिघे साहेबांची शिकवण यांच्याबाबत आम्ही सत्तेसाठी कधीही प्रतारणा केली नाही आणि करणार नाही, असे ट्विट एकनाथ शिंदे यांनी केले 


शिवसेनेशी एकनिष्ठ असणाऱ्या एकनाथ शिंदे यांनी बंड का केलं असा प्रश्न शिवसैनिकांना पडला आहे. 

बंड पुकारल्यानंतर शिवसेनेनं घेतला हा सर्वात मोठा निर्णय 

शिवसेनेचे नेते एकनाथ शिंदे यांनी पक्षाविरोधात कथित बंड पुकारल्यानंतर पक्षप्रमुख आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी त्यांना शिवसेनेच्या विधीमंडळ गटनेतेपदावरुन बडतर्फ केलं आहे. एकनाथ शिदेंनी कथित बंड पुकारल्यानंतर शिवसेनेनं घेतला हा सर्वात मोठा निर्णय आहे. अजय चौधरी यांच्याकडे शिवसेनेच्या गटनेते पदाची जबाबदारी सोपवण्यात आलीय.


शिवसेनेचे ज्येष्ठ नेते आणि मंत्री एकनाथ शिंदे (Eknath shinde)समर्थक आमदारांसह गुजरातमध्ये गेल्याने राज्याच्या राजकारणात भूकंप आलाय. एकनाथ शिंदे यांनी बंड केल्याचं बोललं जातंय. या पार्श्वभूमीवर भाजपा नेते व केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी एकनाथ शिंदे यांचं कौतुक करणारं ट्विट केलंय. तसेच त्यांनी हा निर्णय घेतला नसता तर शिवसेनेचे नेते आनंद दिघे यांच्याप्रमाणे एकनाथ शिंदे यांची अवस्था झाली असती, असा सूचक इशाराही दिला. नारायण राणे यांच्या या ट्वीटची सध्या जोरदार चर्चा आहे.

नारायण राणे आपल्या ट्वीटमध्ये म्हणाले, “शाब्बास एकनाथजी, योग्य वेळी योग्य निर्णय घेतला, नाही तर लवकरच तुझा आनंद दिघे झाला असता.”

मुंबई ते दिल्ली विमान प्रवास दरम्यान वाचली हनुमान चालीसा, उद्धव ठाकरेंची उलटी गिनती सुरु, असे ट्विट खासदार नवनीत राणा यांनी केले आहे. #eknathshinde #thane #shivsena #thanekar #uddhavthackeray #balasahebthackeray #yuvasena #thanewest #thanecity #curtains #maharashtra #adityathackeray #shivamfurnishing #sofaset #vivianamall #manpada #wallpaper #blinds #mattress #thanemall #marathi #supriyasule #shivsenabhavan #balasaheb #sharadpawarspeaks #shivsenamumbai #sharadpawar #cmomaharashtra #ajitpawar #uddhavsaheb