जिल्हा परिषद सिटी प्राथमिक शाळेत शाळा प्रवेशोत्सव| - KhabarBat™

Breaking

KhabarBat™

२००९ पासून वाचकांच्या सेवेत

२९ जून २०२२

जिल्हा परिषद सिटी प्राथमिक शाळेत शाळा प्रवेशोत्सव|जिल्हा परिषद सिटी प्राथमिक शाळेत नवीन शैक्षणिक सत्राचा शुभारंभ इयत्ता पहिलीत दाखल झालेल्या विद्यार्थ्यांचे स्वागत करून करण्यात आला. याप्रसंगी शाळा व्यवस्थापन समिती चे पदाधिकारी तसेच विद्यार्थ्यांचे पालक मोठ्या संख्येत उपस्थित होते. पालकांच्या हस्ते फीत कापून कार्यक्रमाचा शुभारंभ करण्यात आला.
सुरुवातीला इयत्ता पहिलीमध्ये दाखल झालेल्या मुलांना पुष्पगुच्छ देऊन, रंगीत फुगे, चॉकलेट देऊन त्यांचे शाळेत स्वागत करण्यात आले. त्यानंतर या मुलांना नवीन पुस्तके वाटप करण्यात आली. दुपारच्या मध्यान्ह भोजनात शाळेतील सर्व मुलांना खिचडीसह गोड खाऊ देण्यात आला. पहिली मध्ये दाखल झालेल्या विद्यार्थ्यांना गणवेश वाटप करण्यात आले सोबतच त्यांच्या पालकांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात आले. . शाळेच्या मुख्याध्यापिका वैशाली सूर्यवंशी यांनी पालकांना मार्गदर्शन करून कार्यक्रमाची रूपरेषा सांगितली. कार्यक्रमाचे आयोजन शाळेच्या मुख्याध्यापीका वैशाली सूर्यवंशी यांनी केले तर आयोजनासाठी सहायक शिक्षिका पार्वती आत्राम व शाळा समितीच्या सदस्यांनी सहकार्य केले.#education #learning #school #motivation #students #love #study #student #science #knowledge #teacher #children #college #india #covid #kids #university #learn #bhfyp #business #teaching #success #instagood #community #teachers #instagram #technology #inspiration #english #art