पोलीस अधीक्षक अरविंद साळवे दीर्घ रजेवर; राहुल मानकीकर यांच्याकडे प्रभार #Chandrapur #SP - KhabarBat™

Breaking

KhabarBat™

२००९ पासून वाचकांच्या सेवेत


१६ जून २०२२

पोलीस अधीक्षक अरविंद साळवे दीर्घ रजेवर; राहुल मानकीकर यांच्याकडे प्रभार #Chandrapur #SPचंद्रपूर जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक अरविंद साळवे दीर्घ रजेवर गेले असून त्यांचा प्रभार नागपुरातील पोलीस उपायुक्त राहुल माकणीकर यांच्याकडे सोपवण्यात आला. 

पोलीस अधीक्षक अरविंद सावळे साळवे रजेवर जात नाही तोच चंद्रपूर शहरांमध्ये मोठ्या प्रमाणात गुन्हे घडले. दोन दिवसात खून, आत्महत्या आणि मारहाणीच्या घटना उघडकीस आल्या आहेत. याच आठवड्यात अतिरिक्त पोलीस अधीक्षक कुलकर्णी यांची उस्मानाबाद येथे बदली झाली. त्यानंतर दोन दिवसानंतरच पोलीस अधीक्षक अरविंद साळवे हे दीर्घ रजेवर गेलेत. शिवाय स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक बाळासाहेब खाडे देखील रजेवर आहेत. जिल्ह्यातील महत्त्वाच्या पदावर असलेले पोलीस अधिकारी जिल्ह्यात नसल्याने पोलिस यंत्रणेवर मोठा ताण निर्माण झालेला आहे. अशातच पोलीस अधीक्षक अरविंद साळवे यांच्या पदाचा कार्यभार नागपुरातील पोलीस उपायुक्त राहुल यांच्याकडे सोपवण्यात आला आहे, तर अतिरिक्त पोलीस अधीक्षक यांचा प्रभार शेखर देशमुख यांच्याकडे देण्यात आलेला आहे.