अनुप यादव यांच्यावर प्राणघातक हल्ला करणाऱ्या दीपक बारच्या मालकावर गुन्हा दाखल करण्याची मागणी #chandrapur #police - KhabarBat™ | Breaking News India

Breaking

KhabarBat™ | Breaking News India

News Website | Breaking News | latest Update

गुरुवार, जून १६, २०२२

अनुप यादव यांच्यावर प्राणघातक हल्ला करणाऱ्या दीपक बारच्या मालकावर गुन्हा दाखल करण्याची मागणी #chandrapur #policeपडोली येथील दीपक बार समोर डिजिटल मीडियाचे पत्रकार अनूप यादव यांच्यावर प्राणघातक हल्ला केल्याप्रकरणी पोलिस अधीक्षक राहुल माकणीकर यांच्याकडे आज 16 जून रोजी केली आहे. 

दोन दिवस आधी अनुप यादव हे बियर बार समोर सुरू असलेल्या झगड्याचे व्हिडिओ शूटिंग करत असताना त्या बार मालकांनी लोखंडी वस्तू ने मारहाण केली. यात अनुप यादव यांच्या शरीरावर मोठ्या जखमा झाल्या. त्यांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. दरम्यान या प्रकरणी पोलिसांनी पडोली गुन्हा दाखल करण्यास टाळाटाळ केली. पत्रकारांच्या शिष्टमंडळाने प्रभारी पोलीस अधीक्षक राहुल माकनिकर यांची भेट घेत कारवाईची मागणी केली. त्यांनी ठाणेदार कोंडावार यांची कानउघडणी करीत गुन्हा दाखल करण्याची सूचना केली. बार मालक भाटीया यांच्यावर कारवाई करण्याची मागणी होत आहे.