चंद्रपूरच्या राष्ट्रवादीच्या मोठ्या नेत्याचा मृतदेह आढळला | - KhabarBat™

Breaking

KhabarBat™

२००९ पासून वाचकांच्या सेवेत


२३ जून २०२२

चंद्रपूरच्या राष्ट्रवादीच्या मोठ्या नेत्याचा मृतदेह आढळला |

 चंद्रपूरच्या राष्ट्रवादीच्या मोठ्या नेत्याचा मृतदेह आढळला राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी जिल्हा चंद्रपूरचे महासचिव एकनाथ कन्नाके (eknath kannake) यांचा मृतदेह आढळल्याने खळबळ माजली आहे. ते निवृत्त पोलिस अधिकारी होते. 


आदिवासी समाजाच्या उन्नतीसाठी त्यांनी काम केले. त्याचे पार्थिव  रामनगर पोलीस स्टेशनच्या हद्दीत बल्लारपूर मार्गावरील एपीजे अब्दुल कलाम बगिच्याच्या मागे जंगलात झाडाला लटकलेले होते. ही बाबा उघड होताच गर्दी झाली. आत्महत्या की घातपात हे स्पष्ठ झालेले नाही. पोलिसांनी मृतदेह ताब्यात घेतले असून, जिल्हा सामान्य रुग्णालयात नेण्यात आले आहे. 

एकनाथ कन्नाकेनी बुधवारला फाशी घेतली असावी, असा अंदाज व्यक्त केला जात आहे. दुसरीकडे घातपाताची शक्यता वर्तविली जात असल्याने, आत्महत्या की घातपात ? याबाबत गुढ कायम आहे. दरम्यान घटनेची माहीती मिळताच पोलीसांनी घटनास्थळ गाठून पंचनामा केला. पुढील तपास पोलीस करीत आहेत.#Chandrapur #NCP #Body #Ballarpur 

NCP leader found dead near Chandrapur