माना भूमिगत कोळसा खाणीला आग - KhabarBat™ | Breaking News India

Breaking

KhabarBat™ | Breaking News India

News Website | Breaking News | latest Update

मंगळवार, जून २८, २०२२

माना भूमिगत कोळसा खाणीला आग

चंद्रपूर  |  माना भूमिगत कोळसा खाणीला रात्री आग लागली. रात्रपाळी मध्ये काम करायला गेलेल्या कामगारांना खाणीच्या आतून धूर निघताना दिसला त्यावेळी कामगार तात्काळ खाणीच्या बाहेर निघाले, सदर धूर कोळश्याला लागलेल्या आगीचा असल्याचे कामगारांनी सांगितले. 


#coal #mining #coalmining #fire

कोल इंडिया अंतर्गत येणाऱ्या वेस्टर्न कोलफिल्ड्स लिमिटेड मंगळवारी तात्काळ रेस्क्यू टीम ला पाचारण करीत माना कोळसा खाणीला पूर्ण सील करण्यात आले.  नागपूर, ताडाळी येथून बचाव पथक आले होते, डिजीएमएस चे वरिष्ठ अधिकारी सुद्धा निरीक्षणासाठी खाण परिसरात पोहचले.  निरीक्षणानंतर अधिकाऱ्यांनी माहिती दिली की कोळश्या मध्ये नेहमी आग लागत असते, खाणी च्या आतील कोळसा जळत असल्याने सदर घटना घडली. सुदैवाने जीवितहानी झाली नाही सर्व कामगार सुरक्षित आहे. 


#coal #mining #coalmining #fire #shisha #mine #hookah #coalminer #charcoal #tambang #smoke #tambangbatubara #bbq #heavyequipment #industry #industrial #india #miner #coalmine #art #history #climatechange #anaktambang #tambanghits #blackandwhite #miningequipment #photooftheday #tambangnasional #batubara #steel