दुधडेअरी नजिकच्‍या सावरकर नगर परिसरातील नागरिकांची घरे हटवू नये | Chandrapur Railway - KhabarBat™ | Breaking News India

Breaking

KhabarBat™ | Breaking News India

News Website | Breaking News | latest Update

शनिवार, जून १८, २०२२

दुधडेअरी नजिकच्‍या सावरकर नगर परिसरातील नागरिकांची घरे हटवू नये | Chandrapur Railway


शिवसेना महिला जिल्हा संघटिका उज्वला प्रमोद नलगे यांचे निवेदन 


चंद्रपूर | शहरातील दुधडेअरी परिसरातील सावरकर नगर भागात गेल्‍या ५० वर्षापासून पक्‍की घरे बांधून राहणा-या नागरिकांनी रेल्‍वे विभागाने जागा खाली करण्‍याच्‍या नोटीस दिल्‍या आहेत. ही कारवाई त्‍वरीत थांबविण्‍यात यावी अशी मागणी शिवसेना महिला जिल्हा संघटिका उज्वला प्रमोद नलगे यांनी केली आहे. या मागणीचे निवेदन त्यांनी अतिरिक्त जिल्हाधिकारी आणि रेल्वे अधिकाऱ्यांना दिले. 


विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या दक्षिण पश्चिम नागपूर विधानसभा क्षेत्रातील कारवाई थांबविण्यात आली. मात्र, चंद्रपुर येथील सावरकर नगर येथे गेली 50 वर्षापासून राहात असलेल्या लोकांवरील कारवाई थांबविण्यात आली नाही. 


महानगरपालिकेतर्फे या परिसरातील नागरिकांना मुलभूत सुविधा देण्‍यात आल्‍या आहेत. हे नागरिक महानगरपालिकेला मालमत्‍ता कराचा भरणा सुध्‍दा करीत आहे. या नागरिकांची घरे रेल्‍वे साईडींगपासून बरीच दूर आहेत. हे सर्व नागरिक कामगार व मोलमजूरी करणारे आहेत. त्‍यांची घरे हटविल्‍यास त्‍यांच्‍या निवासाचा गंभीर प्रश्‍न निर्माण होणार आहे. ही अन्‍यायकारक कार्यवाही त्‍वरीत न थांबविल्‍यास आंदोलन करण्‍याचा ईशारा जिल्हा संघटिका उज्वला नलगे यांनी दिला आहे. सावरकर नगर येथील रेल्वे प्रशासनाकडुन घरे हटविण्यासाठी नोटीस देण्यात आली.  त्या परिसरातील लोकांच्या व्यथा जाणुन घेवून कारवाई थांबविण्याकरिता जिल्हाधिकारी यांना निवेदन देण्यात आले.  यावेळी वर्षा कोठेकर व महिला उपस्थित होत्या.


Chandrapur Railway

#railway #train #railways #of #trains #rail #trainspotting #world #railroad #our #railwayphotography #photography #trainspotter #ssc #instagram #upsc #railfans #gk #currentaffairs #railwaystation #eisenbahn #railfan #travel #europe #locomotive #india #trainphotography #ssccgl #ias #trainstagram