शेतात पेरणी करताना वीज पडून महिलेचा मृत्यु.सडकअर्जुनी तालुक्यातील सालेधारणी येथील घटना. - KhabarBat™ | Breaking News India

Breaking

KhabarBat™ | Breaking News India

News Website | Breaking News | latest Update

शनिवार, जून १८, २०२२

शेतात पेरणी करताना वीज पडून महिलेचा मृत्यु.सडकअर्जुनी तालुक्यातील सालेधारणी येथील घटना.



संजीव बडोले प्रतिनिधी.
नवेगावबांध दि.१८ जून:-
गोंदिया जिल्ह्यात सडक अर्जूनी तालुका अंतर्गत येत असलेल्या मौजा सालेधारणी येथे लीला योगराज हिडामे वय ४० वर्ष ही स्वतःच्या शेतात पेरणी करत असताना अचानक पाऊस सुरू झाला व लीला च्या अंगावर वीज पडल्याने तिचा शेतातच मृत्यू झाला.गोंदिया जिल्ह्यात आज सकाळ पासूनच ढगाळ वातावरण असून जिल्ह्यात काही ठिकाणी मुसळधार पाऊस पडला आहे.सदर महिलेला 2 मुले आहेत. शासना कडून मृत्यू झालेल्या महिलेच्या परिवाराला आर्थिक मदत देण्यात यावी, अशी मागणी सालेधारणीचे संतोष पाटील, गोंडवाना समाज चे गोंदिया जिल्हा प्रमुख भारत मडावी यांची केली आहे.