शिक्षण विभागातील रिक्त पदे तात्काळ भरावीत: अन्यथा न्यायालयात याचिका दाखल करणार - KhabarBat™ | Breaking News India

Breaking

KhabarBat™ | Breaking News India

News Website | Breaking News | latest Update

गुरुवार, जून ०२, २०२२

शिक्षण विभागातील रिक्त पदे तात्काळ भरावीत: अन्यथा न्यायालयात याचिका दाखल करणारमहाराष्ट्र पुरोगामी प्राथमिक शिक्षक संघटनेच्या राज्य सभेत ठराव


निफन्द्रा प्रतिनिधी(रवींद्र कुडकावार)
दिनांक 28 मे 2022 ला महाराष्ट्र पुरोगामी प्राथमिक शिक्षक संघटनेची राज्य कार्यकारी मंडळ ऑनलाईन सभा राज्याध्यक्ष प्रसाद पाटील यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाली.
         सभेत विद्यार्थी पालक व शिक्षक हिताचे पुढील ठराव मंजूर करण्यात आले. राज्यात सध्या शिक्षण विभागात शिक्षक व अधिकारी वर्गाची पदे मोठ्या प्रमाणात रिक्त आहेत, सर्वत्र प्रभारीवर कारभार सुरू आहे करिता रिक्त पदाबाबत संघटना शासनाकडे अनेक दिवसांपासून पाठपुरावा करीत असून मात्र हा विषय गांभीर्याने घेतला जात नाही करिता शासनाने तात्काळ भरती प्रक्रिया सुरू केली नाही तर न्यायालयात याचिका दाखल करण्याचा निर्णय सभेत घेण्यात आला.


      बालकाचा मोफत व सक्तिच्या शिक्षणाचा अधिकार कायद्या नुसार शिक्षकांचे पदे जास्त रिक्त ठेवता येत नाहीत. असे असताना शासनाने गेली ३ वर्षे भरती केलेली नाही हे कायद्याचे उल्लंघन असल्याने हा निर्णय संघटनेने घेतला आहे.


      यासह राज्यातील सर्व कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन योजना लागू करावी, त्या कर्मचाऱ्यांच्या जुन्या जमा रकमेचा हिशोब मिळावा, समग्र शिक्षा अंतर्गत शाळांच्या उपयोगात न आलेला निधी परत देण्यात यावा व नवीन वर्षातील निधी जुलै मध्ये मिळावा, नव्याने अवघड मध्ये आलेल्या गावांतील शिक्षकांना याच वर्षी बदलीची संधी मिळावी, 30 जूनला सेवानिवृत्त होणाऱ्या शिक्षकांना जुलै ची वेतनवाढ मिळावी, शाळांच्या विजबिलाची सोय करावी, विषय शिक्षकांना सरसकट वेतनश्रेणी मिळावी, शिष्यवृत्ती परीक्षा शुल्क माफ करावे, सर्व विद्यार्थ्यांना मोफत गणवेश मिळावा, नक्षलग्रस्त मधून वगळलेले जिल्हे तालुके पूर्ववत करावे, मुख्याध्यापक केंद्रप्रमुख विस्तार अधिकारी पदोन्नती प्रक्रिया पूर्ण होनेस्तव जिल्ह्यांना निर्देश द्यावेत, मासिक वेतन वेळेवर होण्यासाठी सिएमपी प्रणाली तात्काळ सुरू करावी, या सत्रातील बदल्यांची कार्यवाही पूर्ण करावी या अनेक प्रलंबित विषयाचे निराकरण करण्यासंबंधी ठराव सभेत पारित करण्यात आले, यासह संघटना बांधणीसाठी राज्य व जिल्हा स्तरावर राबवायच्या उपक्रमांचे नियोजन करण्यात आले.


     सभेला राज्यनेते विजय भोगेकर, राज्य सरचिटणीस हरीश ससनकर, राज्य कोषाध्यक्ष बालाजी पांडागळे, महिला राज्याध्यक्ष अल्का ठाकरे, सचिव शारदा वाडकर, कोषाध्यक्ष रुखमा पाटील, संघटक स्नेहल यशवंतराव, राज्य कार्यकारी सचिव रंगराव वाडकर, निखिल तांबोळी, विभाग पदाधिकारी दिलीप महाडिक, राजेश दरेकर, चंद्रपूर जिल्हाध्यक्ष किशोर आनंदवार, गडचिरोली जिल्हाध्यक्ष विलास म्हस्के यांचेसह जिल्हा अध्यक्ष सरचिटणीस व महिला मंच पदाधिकारी उपस्थित होते.