महींद्र गाडीची कोंबड्या भरलेल्या पिकअप गाडीला जबर धडक. ५ गंभीर ७ किरकोळ जखमी.देवलगाव शिवारातील घटना. गावकऱ्यांनी केली कोंबड्यांची दावत. - KhabarBat™ | Breaking News India

Breaking

KhabarBat™ | Breaking News India

News Website | Breaking News | latest Update

रविवार, जून १२, २०२२

महींद्र गाडीची कोंबड्या भरलेल्या पिकअप गाडीला जबर धडक. ५ गंभीर ७ किरकोळ जखमी.देवलगाव शिवारातील घटना. गावकऱ्यांनी केली कोंबड्यांची दावत.

देवलगाव ग्रामवाशीयांची मात्र चंगळ, केली कोंबड्यांची दावत.संजीव बडोले प्रतिनिधी.

नवेगावबांध दि. १२ जून:-
गोंदिया जिल्ह्यातील अर्जुनी मोरगाव तालुक्यातील
कोहमारा-वडसा मार्गावर देवलगाव शिवारात रस्त्याच्या डाव्या कडेला उभ्या असलेल्या कोंबड्या भरलेल्या पीकअप गाडीला नवेगावबांध कडुन चंद्रपुरला जाणा-या महींद्रा एसयुव्ही प्रवासी गाडीने जबर धडक दिल्याने
झालेल्या अपघातात पाच गंभीर जखमी तर सात जण किरकोळ जखमी झाल्याची माहिती आहे. सुदैवाने या अपघातात जीवितहानी झाली नाही. ही घटना आज दिनांक १२ जून रोज रविवार ला सकाळी साडेचार ते पाच वाजेच्या दरम्यान घडली.प्राप्त माहितीनुसार,विलास अर्जुन चौधरी वाहन चालक राहणार गांगलवाडी तालुका चंद्रपूर हे सत्यवान गणपत निंबेकर राहणार तालुका आरमोरी जिल्हा गडचिरोली यांच्या मालकीची महिंद्रा बोलेरो मॅक्सिट्रक( पिकअप) क्रमांक एमएच ३३,टी २६३६, वर्मा पोल्ट्री फार्म दातापूर खुर जिल्हा राजनांदगाव छत्तीसगढ येथून देशी कॉकरेल जातीच्या १२०० कोंबड्या घेऊन वडसाला जायला निघाला होते.देवलगाव येथील कोहमारा वडसा मार्गावर आश्रम शाळेच्या जवळ वाहक शौचास गेला होता. त्यामुळे कोबड्याची वाहतूक करीत असलेली पिकअप गाडी डाव्या बाजूला रस्त्याच्या कडेला उभी होती. पिकप गाडी चा क्लिनर गाडीतच बसून होता. अर्जुनी मोरगाव च्या दिशेने जाणाऱ्या कनसु छेदीलाल निषाद राहणार न्यू लखमापूर,जिल्हा चंद्रपूर हे भरधाव वेगाने चालवित असलेल्या महिंद्रा कंपनीची एक्सयुव्ही गाडी क्रमांक जिजे०५,जेएम ७८६७ भरधाव वेगाने पिकअप गाडीला जोरदार धडक दिली.प्रवासी गाडीने पिकअपगाडी ला जबरदस्त धडक दिली. धडक एवढी जोरात दिली की, डाव्या बाजूची पिकअप गाडी उजव्या बाजूला जाऊन शेतात उलटली, त्यामुळे १०० ते १५० कोंबड्या मृत्यूमुखी पडल्या. धडक दिल्यानंतर रोडच्या उजव्या बाजुला शेतामध्ये गेली व कोंबड्यांचा पिंजरा गाडीवरुन पलटी होवुन खाली पडला .महीद्रा गाडी डाव्या बाजुला पलटी झाली .तसेच महींद्रा गाडीमध्ये असलेले ९ जण जखमी झाले. यात सुदैवाने मनुष्य जिवितहानी झाली नाही .यामध्ये २ बालके, ४ स्त्रीया,६ पुरुषाचा समावेश आहे. यामध्ये ४ ते ५ गंभीर जखमी झाले. अपघाताची माहिती होताच, देवलगाव ग्रामवासी अपघातस्थळी धावून आले. या दुर्घटनेत जिजे ०५,जेएम ७८६७ या गाडीचा अक्षरशः चुराडा झाला.चेंदामेंदा झालेल्या महिंद्रा गाडीतून जखमी स्त्री-पुरुषांना,मुलांना बाहेर काढले.अपघाताची माहिती नवेगावबांध पोलिसांना मिळताच तेही घटनास्थळी दाखल झाले. पिकअपच्या क्लीनर विकेश सुरेश हूड वय २८ वर्षे राहणार तालुका आरमोरी,जिल्हा गडचिरोली
सह सर्व जखमींना उपचारासाठी ग्रामीण रुग्णालय नवेगावबांध येथे दाखल करून, त्यांच्यावर उपचार करण्यात आले . चार ते पाच जणांच्या हाता- पायाला गंभीर जखमा झाल्याची माहिती आहे.
अपघातातील जखमी नानू निषाद वय ३४ वर्षे, हंसराज निषाद वय २८ वर्षे, संतादेवी निषाद वय २१ वर्षे, सोमी निषाद वय ४० वर्षे, राजूलिया निषाद वय ५५ वर्षे ,हे गंभीर जखमी झाले आहेत.कनसु निषाद, रुक्कोनीबाई निषाद, छेदीलाल निषाद, ,नयन निषाद,पुनादेवी निषाद, सुनील निषाद, पुनम निषाद हे सर्व आझादनगर न्यू लखमापूर जिल्हा चंद्रपूर येथील रहिवासी आहेत.
हे किरकोळ जखमी झाले आहेत.
ग्रामीण रुग्णालयातील वैद्यकीय अधिकाऱ्यांनी प्राथमिक उपचारानंतर गंभीर जखमींना केटीएस सामान्य रुग्णालय गोंदिया येथे पुढील उपचारासाठी नेण्याचा सल्ला दिला. मात्र पोलिसात तक्रार नको म्हणून व सर्व एकाच कुटुंबातील असल्यामुळे चंद्रपूर वरून गाड्या बोलावून सर्व जखमींनी आपल्या स्वगावी चंद्रपुर ला उपचार करणे पसंत करून, येथून काढता पाय घेतला. अपघातात जीव गेला मात्र १०० ते १५० कोंबड्यांचा. काही कोबड्या मरण पावल्या. मृत झालेल्या कोंबड्या व काही जिवंत कोंबड्या मिळेल देवलगाव येथील ग्रामवाशीयांनी या अपघाताची चंगळ करून घेतली . ज्याने त्याने हातात मिळाल्या त्या चार ते पाच कोंबड्या घेऊन कोंबड्यावर यथेच्छ ताव मारला. देवलगाव ग्रामवासीयांनी कोंबड्या नेवुन दावत उडवली. जीव गेला तो मात्र बिचाऱ्या कोंबड्यांचा. कोंबड्या वाहून नेणाऱ्या पिकअप गाडीच्या वाहकाने नवेगावबांध पोलिसात तक्रार दाखल केली आहे. पिकअप वाहकाच्या तक्रारीवरून पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.

कोट---
सदर बातमीदाराने पोलिस स्टेशन नवेगावबांध येथे वारंवार संपर्क करून देखील नवेगावबांध पोलिसांनी अपघात होऊन १२ तास उलटून देखील अपघाताची माहिती देण्याचे सौजन्य दाखवले नाही. यावरून अपघाताला कारणीभूत असणाऱ्यांना पोलीस पाठीशी तर घालत नाही ना? अशी शंका व्यक्त होत आहे. घटनास्थळावरून अपघातग्रस्त गाड्याही कधी नव्हे त्या मोठ्या तत्परतेने हलविण्यात आल्याचे समजते.
----
पुढील तपास पोलीस करीत आहेत.