२३ जून २०२२
Home
Unlabelled
एकुलत्या एक लेकराला काळाने हिरावून घेतले.२८ वर्षीय युवकाचा वीज पडून मृत्यू.बोरटोला येथील दुर्दैवी दुर्घटना.
एकुलत्या एक लेकराला काळाने हिरावून घेतले.२८ वर्षीय युवकाचा वीज पडून मृत्यू.बोरटोला येथील दुर्दैवी दुर्घटना.
नवेगावबांध दि.२३ जून:- गोंदिया जिल्ह्यातील अर्जुनी मोरगाव तालुक्यातील बोरटोला (सावरटोला) येथील युवा
शेतकरी पवन मनोहर गुढेवार वय २८ वर्षे स्वतः च्या शेतात काम करित असतांना दुपारी १.३० वाजेदरम्यान विज पडुन गंभीर जख्मी झाला. व त्याला नवेगांवबांध ग्रामिण रुग्णालयातउपचारा दरम्यान मुत्यु झाला.ही दुर्दैवी घटना आज दि.२३ जून रोज गुरुवारला दुपारी १.३० वाजे दरम्यान घडली.
सध्या परिसरात मृगनक्षत्राच्या सरी बरसल्यामुळे शेतकऱ्यांची शेतात विविध कामे सुरू आहेत. त्यामुळे आकाशात अचानक ढग दाटून येतात व पावसाच्या सरी बरसतात. विजांचा कडकडाट होतो. कधीकधी निसर्गाचा कोप अनुभवायला येतो. आज दिनांक २३ जून ला निसर्गाने आपले असेच रौद्ररूप दाखवून,२८ वर्षीय पवन या युवकाला आपल्या कवेत घेतले.
येथून जवळच ६ किलोमीटर अंतरावर असलेल्या बोरटोला सावरटोला येथील शेतकरी मनोहर गुढेवार यांची घराच्या मागेच शेत जमीन आहे. सकाळी ११.० वाजेच्या सुमारास आई योगिताबाई गुढेवार,बहीणआशा गुढेवार सकाळी शेतामध्ये काम करायला गेले होत्या.१.०० वाजेच्या दरम्यान पवन आपल्या आई- बहिणीला शेतीच्या कामात मदत करायला शेतात गेला होता. शेतात काम करीत असताना दुपारी १.३० वाजेच्या दरम्यान अचानक पवन च्या अंगावर वीज कोसळली.तो वीज पडून गंभीर जखमी झाला. उपचारासाठी त्याला ग्रामीण रुग्णालय नवेगावबांध येथे तातडीने दाखल करण्यात आले.मनोहर व योगिता गुडेवार यांना पवन हा एकुलता एक मुलगा होता.पवनला काळाने असे ओढून नेले.आई योगिता हिने एकच हंबरडा फोडला.मनोहर यांचे अवसानच गळाले.२८ वर्षीय होतकरू पवन यांच्या मृत्यूने बोरटोल्यावर शोककळा पसरली.
----
काही दिवसापूर्वी पवनने सीआरपीएफ ची परीक्षा दिली होती. शारीरिक क्षमता परीक्षा उत्तीर्ण देखील झाला होता.आता फक्त त्याची वैद्यकीय परीक्षा बाकी होती. उद्या दि. २४ जूनला रेल्वे विभागाची परीक्षा द्यायला तो नागपूरला जाणार होता. परंतु दुर्दैवाने काळाने त्याच्यावर घाला घातला.
-------
इकडे २.०० वाजेच्या दरम्यान उपचारादरम्यान त्याची प्राणज्योत मालवली. पवन हा अविवाहित होता. त्याच्या मागे आई-वडील व तिघ्या बहिणी व बराच मोठा आप्तपरिवार आहे. ग्रामीण रुग्णालयात शवविच्छेदनानंतर मृतकाचे प्रेत त्याच्या कुटुंबीयांच्या हवाली करण्यात आले. उद्या सकाळी नऊ वाजता स्थानिक स्मशान घाटावर त्यांच्यावर अंत्यसंस्कार होणार आहे. आकस्मिक मृत्यूची नोंद पोलिसांनी केली असून, नवेगावबांध पोलीस ठाण्याचे ठाणेदार सहाय्यक पोलीस निरीक्षक संजय पांढरे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हवालदार साईनाथ नाकाडे,सहाय्यक पोलीस फौजदार अनंत तुलावी, नापोसे मुकुंदा भुरे यांनी पंचनामा केला.नवेगावबांध पोलीस पुढील तपास करीत आहेत.
खबरबात
भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.
- प्रकाशक
ईमेल [email protected]
[email protected]
