सम्राट अशोक विद्यालयाचा शंभर टक्के निकाल.१२ प्राविण्य प्राप्त विद्यार्थ्यांसह,प्रथम श्रेणीत १३ विद्यार्थी उत्तीर्ण. - KhabarBat™ | Breaking News India

Breaking

KhabarBat™ | Breaking News India

News Website | Breaking News | latest Update

शुक्रवार, जून १७, २०२२

सम्राट अशोक विद्यालयाचा शंभर टक्के निकाल.१२ प्राविण्य प्राप्त विद्यार्थ्यांसह,प्रथम श्रेणीत १३ विद्यार्थी उत्तीर्ण.

१२ प्राविण्य प्राप्त विद्यार्थ्यांसह, प्रथम श्रेणीत १३ विद्यार्थी उत्तीर्ण.

संजीव बडोले प्रतिनिधी.

नवेगावबांध दि.१७.
सम्राट अशोक विद्यालय उमरी येथील माध्यमिक शालान्त परीक्षेचा निकाल शंभर टक्के लागला आहे परीक्षेला परीक्षेला एकूण 30 विद्यार्थी बसले होते 12 विद्यार्थी प्रावीण्य श्रेणीत उत्तीर्ण झाले,प्रथम श्रेणी 13 विद्यार्थी उत्तीर्ण झाले, द्वितीय श्रेणीत पाच विद्यार्थी उत्तीर्ण झाले. सर्व गुणवंत व उत्तीर्ण विद्यार्थ्यांचे संस्थेचे सचिव एल. आर.भैसारे यांनी अभिनंदन केले आहे. विद्यालयातून ८५.६० टक्के गुण घेऊन साक्षी रणजीत कापसे प्रथम आली. ८५.४० टक्के गुण घेऊन यज्ञा रवीकुमार येरणे, तर तृतीय क्रमांकाने८४.४० टक्के गुण घेऊन नंदिनी रवींद्र पराते उत्तीर्ण झाले. सर्व गुणवंत विद्यार्थ्यांचे घरी जाऊन पुष्पगुच्छ व मिठाई भरवून विद्यालयाचे मुख्याध्यापक एस.एस. टेंभुर्णे,वर्गशिक्षक एस.व्ही. बडोले,के.एम.भैसारे यांनी सत्कार करून गुणवंत व उत्तीर्ण विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले. विद्यार्थ्यांनी आपल्या यशाचे श्रेय आई-वडील व शिक्षकांना दिले. गुणवंत विद्यार्थ्यांचे गावात सर्वत्र अभिनंदन होत आहे.