अर्जुनी मोर येथे राजमाता अहिल्याबाई होळकर जयंती साजरी. धनगर अधिकारी व कर्मचारी संघटनेचे आयोजन. - KhabarBat™

Breaking

KhabarBat™

२००९ पासून वाचकांच्या सेवेत


०१ जून २०२२

अर्जुनी मोर येथे राजमाता अहिल्याबाई होळकर जयंती साजरी. धनगर अधिकारी व कर्मचारी संघटनेचे आयोजन.
संजीव बडोले प्रतिनिधी.
नवेगावबांध दि. १ जून:-

 धनगर अधिकारी व कर्मचारी संघटनेच्या वतीने अर्जुनी मोर. येथे राजमाता अहिल्याबाई होळकर जयंती मोठ्या उत्साहात  साजरी करण्यात आली. ईटियाडोह पाटबंधारे विभागाचे कार्यालयाजवळील सार्वजनिक    सांस्कृतिक भवनात 31 मे रोजी पुण्यश्लोक राजमाता अहिल्याबाई होळकर यांच्या 297 व्या  जयंती चे आयोजन करण्यात आले होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी अर्जुनी मोर. पोलीस स्टेशनचे सहाय्यक ठाणेदार जे.पी.हेगडगर होते.तर अतिथी म्हणुन पंचायत समिती चे विस्तार अधिकारी बि. के.बंडगर,मदने सर, लुचे सर,बाजगीर सर,नरेंद्र गोमासे व अन्य मान्यवर प्रामुख्याने   उपस्थित होते.सर्वप्रथम दुर्गा चौक अर्जुनी मोर. येथुन एका सुसज्ज रथावर राजमाता अहिल्याबाई होळकर यांचे फोटोसह शहरातील प्रमुख रस्त्याने विशाल रॅलीसह मिरवणूक काढण्यात आली. रॅलीचा समारोप सिव्हील लाईन येथील सार्वजनिक सांस्कृतिक भवनात करण्यात आला.सर्वप्रथम राजमाता अहिल्याबाई होळकर यांचे प्रतिमेचे पूजन व माल्यार्पण तथा दीप प्रज्वलन करून कार्यक्रमाची सुरवात करण्यात आली. यावेळी विवीध मान्यवरांनी राजमाता अहिल्याबाई होळकर यांचे जिवन कार्यावर प्रकाश टाकुन विस्तृत माहिती दिली. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी  धनगर अधिकारी व कर्मचारी संघटनेचे  अविनाश लोहारे, नरेश वावरे,बंडगर , रुपेश वावरे,चंद्रशेखर हलाले,नरेंद्र गोमासे व समाज बांधव महीला पुरुष यांनी विशेष परिश्रम घेतले.