चंद्रपूर जिल्हाधिकारी बंगला परिसरात पडली वीज:ताडाच्या झाडाला लागली आग - KhabarBat™

Breaking

KhabarBat™

२००९ पासून वाचकांच्या सेवेत


१९ जून २०२२

चंद्रपूर जिल्हाधिकारी बंगला परिसरात पडली वीज:ताडाच्या झाडाला लागली आग

m
संग्रहित दृश्य 
चंद्रपूर :
पाऊस सुरू असताना सिव्हिल लाईन परिसरातील जिल्हाधिकारी बंगल्याच्या परिसरात वीज पडल्याची
घटना शुक्रवारी रात्रीच्या सुमारास घडली. या घटनेत ताडाच्या झाडाला आग लागली. लगेच अग्निशमन पथकाला पाचारण करून आग विझविण्यात आली. शुक्रवारी चंद्रपुरात विजांच्या गर्जनेसह पाऊस आला.

 दरम्यान,जिल्हाधिकारी बंगल्याच्या परिसरात वीज कोसळली. याबाबत जिल्हाधिकारी अजय गुल्हाने म्हणाले,वीज  पडली तेव्हा मी घरी नव्हतो. घरापासून ५० फूट अंतरावर ही घटना घडली. अग्निशमन पथकाला पाचारण करण्यात आले. त्यानंतर  घटनास्थळी दाखल होऊन आग विझविण्यात आली. पावसाचे दिवस असल्याने नागरिकांनी सतर्क राहावे. झाडाखाली आश्रय घेऊ नये, असेही आवाहनही त्यांनी केले.