मच्छीमारावर इरई धरण परिसरात जंगली डुकराचा हल्ला - KhabarBat™ | Breaking News India

Breaking

KhabarBat™ | Breaking News India

News Website | Breaking News | latest Update

मंगळवार, मे २४, २०२२

मच्छीमारावर इरई धरण परिसरात जंगली डुकराचा हल्ला

छोटा बाजार चौकातील रहिवासी मच्छीमारावर इरई धरण परिसरात जंगली डुकराचा हल्ला
चंद्रपूर येथील छोटा बाजार चौक रहिवासी मच्छीमार तानाजी गणपत पर्शिवे यांच्यावर इरई धरण परिसरात जंगली डुकरानी हल्ला केला. ते यात जखमी झाले असून, त्यांना उपचारार्थ जिल्हा सामान्य रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

तानाजी रोजच्या प्रमाणे सकाळी आपल्या घरून इरई धरण येथे मच्छी पकडायला गेले होते. या दरम्यान त्यांच्यावर जंगली डुकरानी हल्ला चढविला. या हल्ल्यात त्यांच्या पायावर, मांडीवर व कमरेवर गंभीर जखमा झाल्या. त्यांना जखमी अवस्थेत चंद्रपूर जिल्हा सरकारी रुग्णालयात उपचारार्थ दाखल करण्यात आले. 

माहितीनुसार  इराई धरण परिसर ताडोबा जंगलालगत आहे. या परिसरात जंगली प्राण्यांचे वास्तव्य नेहमी असते. इथे वन्य प्राणी पाणी पिण्यास येतात. त्यामुळे हा परिसर संवेदनशील आहे. जखमी तानाजी ला वेळेवर उपचार मिळाल्यामुळे त्याची प्रकृर्ती धोक्याबाहेर असण्याची माहिती डॉक्टरानी दिली.


Wild boar attack on fisherman in Erie dam area